गुप्त नवरात्रीचा शेवटचा दिवस, या राशीच्या लोकांना होणार फायदा

गुप्त नवरात्रीची नवमी तिथी आज शुक्रवार, 4 जुलै रोजी साजरी केली जाणार (durga puja)आहे. या दिवशी देवी दुर्गेची पूजा केली जाते. नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी देवीची पूजा केल्याने या राशीच्या लोकांना फायदा होतो.

धार्मिक मान्यतेनुसार, देवीची महिमा अमर्याद आहे असे म्हटले जाते.(durga puja) देवीच्या कृपेमुळे भक्तांच्या जीवनातील सर्व मानसिक आणि शारीरिक दुःख दूर होतात. कोणत्या राशीच्या लोकांना होणार फायदा, जाणून घ्या

पंचांगानुसार, आषाढ गुप्त नवरात्रीची सुरुवात 26 जूनपासून झालेली आहे. यावेळी देवीच्या 9 रुपांची पूजा केली जाते. या नवरात्रीची समाप्ती आज शुक्रवार, 4 जुलै रोजी होत(durga puja) आहे. यावेळी देवीची पूजा केल्याने भक्तांच्या जीवनातील सर्व मानसिक आणि शारीरिक दुःख दूर होतात असे मानले जाते.

गुप्त नवरात्रीमधील अष्टमी नवमी तिथी कधी आहे
आषाढ गुप्त नवरात्रीची अष्टमी तिथी 3 जुलै रोजी आहे तर नवमी तिथी शुक्रवार, 4 जुलै रोजी आहे. या दोन्ही दिवशी देवीची पूजा केली जाते. तसेच अष्टमी आणि नवमी तिथीला कन्या पूजन देखील केले जाते.

नवमीला पूजेला मुहूर्त
सूर्योदय – सकाळी 5.28 वाजता

चंद्रोदय – दुपारी 1.47 वाजता

ब्रह्म मुहूर्त – पहाटे 4.7 ते 4.48 पर्यंत

अभिजित मुहूर्त – सकाळी 11.58 ते दुपारी 12.53 पर्यंत

गोधुली मुहूर्त – संध्याकाळी 7.22 ते 7.42 पर्यंत

अमृत काळ – सकाळी 9.38 ते 11.26 पर्यंत

राहु काळ – सकाळी 10.41 ते दुपारी 12.26 पर्यंत

गुलिक काळ – सकाळी 7.12 ते सकाळी 8.57 पर्यंत

ज्योतिषशास्त्रानुसार असे मानले जाते की, आदिशक्ती देवी दुर्गेची पूजा केल्याने साधकाला विशेष आशीर्वाद मिळतो, अशी मान्यता आहे. तसेच त्या व्यक्तीची प्रत्येक इच्छा देखील पूर्ण होते. अशा व्यक्तींना कधीही पैशांची कमतरता भासत नाही. जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी

वृषभ रास
वृषभ राशीचा स्वामी शुक्र असल्याने या लोकांना शुभ कार्यामध्ये यश मिळेल. त्याचप्रमाणे या लोकांच्या सर्व समस्या दूर होतील. मन आनंदी राहील. करिअर आणि व्यवसायामध्ये नवीन संधी मिळू शकते. ज्या लोकांचे काम दीर्घकाळापासून अडकलेले आहे त्यांचे काम पूर्ण होईल. परिवारामध्ये आनंदाचे वातावरण राहील. तुम्ही एखाद्या दीर्घकालीन योजनेत गुंतवणूक करु शकता त्याचा तुम्हाला भविष्यात फायदा होईल. आर्थिक समस्या दूर होतील.

केतुच्या संक्रमणामुळे मिथुनसह या राशीच्या लोकांचे चमकेल भाग्य, अचानक होईल संपत्तीत वाढ
तूळ रास
देवी दुर्गेची कृपा तूळ राशीच्या लोकांवर असते, असे म्हटले जाते. कारण या राशीचा स्वामी शुक्र आहे. जो आनंदाचा कारक मानला जातो. शनिदेव तूळ राशीमध्ये उच्च असल्याने या राशीच्या लोकांना नेहमी शुभ लाभ होतोच. या लोकांना शुभ कार्यात यश मिळते. तसेच प्रलंबित कामांना गती मिळते. आर्थिक समस्या दूर होतात. जमीन किंवा मालमत्तेशी संबंधित लोकांना यश मिळेल.

हेही वाचा :

पीएमपीचे ‘स्टेरिंग’ ठेकेदारांच्या हातात, लवकरच १ हजार बस धावणार रस्त्यावर.. 

SL vs BAN सामना थांबवला, मॅचमध्ये आला खास पाहुणा! मैदानावर गोंधळ, नक्की कारण काय?

वयाच्या ६० व्या वर्षी राहाल कायम फिट आणि तरुण! पाणी पिण्याचे ‘हे’ नियम आरोग्यासाठी ठरतील वरदान