भारतीयांचं आपल्या जेवणावर विशेष प्रेम असतं. त्यात जर जेवण नॉनव्हेज(biryani) असलं तर विषयच संपतो. आणि नॉनव्हेजमध्ये ही जर बिर्याणी असली तर मजा वेगळीच. सध्या असाच बिर्याणीमध्ये लेग पिसं नसल्यामुळे भांडण झाल्याचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.
व्हायरल व्हिडिओत लग्नातील जेवणाच्या टेबलजवळ(biryani) नातेवाईकांमध्ये जोरदार भांडण झाल्याचे पाहायला मिळत आहे. सर्वजण जेवण जेवत होते. परंतु एका बाजूला अचानक गडबड- गोंधळ होतो. या गोंधळाचे कारण म्हणजे चिकन बिर्याणीत लेगपीस नव्हते. चिकन बिर्याण हा पदार्थ सर्वांनाच आवडतो.
परंतु याच बिर्याणीत जर लेगपीस नसेल तर कसं होणार? परंतु लेगपीस नसल्याने जोरजोरात हाणामारी झाली. खूप लोक एकमेकांना मारताना दिसत आहे.लाथा-बुक्क्या, खुर्च्या फेकून एकमेकांना मारताना दिसत आहे. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना उत्तर प्रदेशमधील बरेली येथील आहे. बरेलीमधील एका लग्नात हा धक्कादायक प्रकार घडला आहे.Arj6n या एक्स अकाउंटवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. त्यावर लेगपीसवरुन भरलग्नात भांडण झाल्याचे सांगितले आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी मात्र मजेशीर कमेंट्स केल्या आहेत.
हेही वाचा :
भाजपा नेत्यावर अल्पवयीन मुलीचा बलात्कार आणि खूनाचा आरोप
1 जुलैपासून बदलणार महत्त्वाचे नियम; सर्वसामान्यांच्या खिशावर होणार थेट परिणाम
ब्रेकिंग! चंद्रकांत पाटील यांनी मोठ्ठी कॅडबरी देत घेतली उद्धव ठाकरेंची भेट