आकाशात उड्डाण करत असताना प्रत्येक प्रवाशाला सुरक्षित प्रवासाची अपेक्षा असते.(passengers)पण, विमानातच जर कोणी नियमांचं उल्लंघन करत असेल, तर त्याचा परिणाम संपूर्ण प्रवासावर होऊ शकतो. अशीच एक धक्कादायक आणि लज्जास्पद घटना नुकतीच घडली असून, एका प्रवाशाने विमानातील ‘लाइफ जॅकेट’ चक्क चोरल्याचा प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे ही चोरी एका सतर्क प्रवाशाच्या लक्षात आल्याने चोराला रंगेहाथ पकडण्यात यश आलं. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

ही घटना एका देशांतर्गत प्रवासादरम्यान घडली. प्रवास सुरू होण्याआधीच एका प्रवाशाने आपल्या खालील सीटखालून असलेल्या आपत्कालीन सुरक्षेसाठी ठेवलेल्या लाइफ जॅकेटवर डोळा ठेवला. त्यानंतरच काही वेळातच त्याने ते जॅकेट हळूच काढून आपल्या बॅगेत ठेवण्याचा प्रयत्न केला.(passengers) हे सगळं इतक्या चतुराईने करण्यात आलं होतं की इतर प्रवाशांच्या लक्षातही आलं नसतं, पण सुदैवाने एका सतर्क प्रवाशाने हा प्रकार पाहिला आणि त्याने तात्काळ विमान कर्मचाऱ्यांना याची माहिती दिली.
या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ त्याच विमानातील एका प्रवाशाने शूट केला होता. त्यात संबंधित चोरट्याला कर्मचाऱ्यांकडून जाब विचारताना आणि त्याने चोरलेलं जॅकेट काढून देताना स्पष्ट दिसत आहे. व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून लोक यावर तीव्र संताप व्यक्त करत आहेत. ”विमानात सुरक्षिततेशी खेळणं म्हणजे संपूर्ण प्रवाशांच्या जिवाशी खेळणं,” अशा शब्दांत अनेकांनी व्यक्तीवर टीका केलेली आहे.
A Passenger got Caught Allegedly Stealing life jacked on Flight:
— Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) June 25, 2025
pic.twitter.com/TM02zd1jGW
लाइफ जॅकेट हे प्रत्येक प्रवाशाच्या सीटखाली ठेवलेलं एक महत्त्वाचं सुरक्षा उपकरण असतं. विमानात आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास त्याचा वापर करून जीव वाचवता येतो. (passengers)जर हे उपकरण आधीच चोरीला गेलं असेल तर संबंधित प्रवाशाचाच नव्हे तर इतरांचा जीवही धोक्यात येऊ शकतो. त्यामुळे अशा प्रकारांवर तात्काळ आणि कठोर कारवाई होणं आवश्यक ठरतं
हेही वाचा :
वणवा पेटण्यास सुरूवात, हिंदी सक्तीविरोधात भाजपात पहिला राजीनामा
३४५ राजकीय पक्षांवर टांगती तलवार, निवडणूक आयोग नोंदणी रद्द करणार