रिअॅलिटी शो स्टार उर्फी जावेद नेहमीच फिलर्स आणि बोटॉक्स घेण्याबाबत मोकळेपणाने बोलते.(condition)तिच्या या प्रामाणिकपणाबद्दल तिचे कौतुकही केले जाते, कारण चित्रपटसृष्टीतील सेलिब्रिटी याबद्दल बोलण्यास टाळाटाळ करतात. बरं. उर्फीने अलीकडेच सोशल मीडियावर एक नवीन व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये ती ९ वर्षांनी तिचे लिप फिलर्स काढताना दिसत आहे. पण या प्रक्रियेदरम्यान तिच्या ओठांची स्थिती खूपच वाईट झाली. तिचे सुजलेले ओठ पाहून चाहते हैराण झाले आहेत. पण तिने तिचे लिप फिलर्स का काढले, चला जाणून घेऊया.

उर्फी जावेदने रविवारी २० जुलै तिच्या इंस्टाग्राम हँडलवर लिहिले होते की, ‘नाही, हे फिल्टर नाही, मी माझे फिलर्स काढण्याचा विरघळण्याचा निर्णय घेतला, कारण ते नेहमीच चुकीच्या ठिकाणी होते.(condition) मी ते पुन्हा करने, पण नैसर्गिकरित्या. मी फिलर्स अजिबात नाकारत नाही. फिलर्स विरघळणे वेदनादायक आहे.’ यानंतर, उर्फीने तिच्या चाहत्यांना सल्ला दिला आणि म्हटले, ‘फिलर्ससाठी चांगल्या डॉक्टरकडे जाणे खूप महत्वाचे आहे. फॅन्सी क्लिनिकमधील डॉक्टरांना सर्व काही माहिती असतं असं नाही.’
उर्फीने हा व्हिडिओ पोस्ट करताच तो सोशल मीडियावर व्हायरल झाला. यावर अभिनेत्री रिद्धिमा पंडितने लिहिले, ‘आउच’. तर उर्फीची बहीण उरुषा हिने लिहिले, ‘उम्म्म.’ एका चाहत्याने म्हटले, ‘हे सर्व दाखवण्यासाठी हिंमत लागते.’ एका चाहत्याने तर तिला आता कोणतेही फिलर करू नये अशी विनंती करत लिहीले, ‘प्लीज उर्फी, कोणतेही फिलर करू नकोस.(condition) तू अशीच सुंदर आहेस.’
उर्फीने इंस्टाग्रामवर एक फोटो देखील शेअर केली, ज्यामध्ये तिने चाहत्यांना तिच्या ओठांवरून फिलर काढल्याबद्दल माहिती दिली. तिने लिहिले, ‘मला विश्वास बसत नाही की मी माझे फिलर काढत आहे. मी ते १८ वर्षांच्या वयात केले आणि मी स्वतःला कधीही पाउटशिवाय पाहिले नाही. मी ते एका आठवड्याने पुन्हा फिलर करेन, पण यावेळी स्वतःची नीट काळजी घेऊन .
हेही वाचा :
टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, तीन दिवसात तिसऱ्या खेळाडूला दुखापत, स्टार खेळाडू संपूर्ण सीरिजमधून बाहेर
कामाची बातमी! आता EPFOची सर्व माहिती मिळणार डिजीलॉकरवर, कसं? वाचा सविस्तर