सोशल मीडियावर मैत्री अनेकदा मोठ्या संकटात टाकते. महिला, तरुणींना तर वेगवेगळ्या पद्धतीनं फसवलं जातं.(Instagram) अनेक तरुणींना तर प्रेमाच्या जाळ्यात फसवून त्यांच्यावर बलात्कारही केल्याची अनेक प्रकरणं समोर आली आहेत. असे असतानाच आता एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. इन्स्टाग्रामवर मैत्री झाल्यानंतर एका तरुणींसोबत भयंकर घडलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार उत्तर प्रदेशातील रिवा येथे ही घटना घडली आहे. येथे एक तरुणी इन्स्टाग्रामच्या माध्यमातून एका मुलाच्या संपर्कात आली होती. या मुलाचे नाव योगेश प्रताप सिंह असून तोच या प्रकरणातला आरोपी आहे. पीडित तरुणी आणि योगेश सिंह यांच्यात इन्स्टाग्रामच्या माध्यमातून मैत्री झाली. त्यानंतर पीडित तरुणीने हॉटेलवर बोलवून योगेशने तिच्यावर अत्याचार केला. विशेष म्हणजे एकदा नव्हे तर त्याने दोन वेगवेगळ्या ठिकाणी दोन वेळा पीडित तरुणीवर अत्याचार केला.(Instagram) पोलिसांनी रिवा येथून आरोपीला अटक केली आहे.
पीडित तरुणी ही 26 मे रोजीपासून बेपत्ता झाली होती. तिच्या घरच्यांनी तिचा बराच शोध घेतला पण ती सापडली नाही. शेवटी तिच्या कुटुंबीयांनी पोलिसात जाऊन याबाबत तक्रार दिली. पोलिसांनीही प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन या प्रकरणाचा तपास चालू केला. मोबाईल लोकेशनच्या माध्यमातून पोलिसांनी पीडित तरुणीने लोकेशन शोधले. त्यानंतर पीडित तरुणीने तिच्यासोबत नेमकं काय घडलं? याची आपबीती सांगितली.
पीडित तरुणीने दिलेल्या माहितीनुसार ती इन्स्टाग्रामच्या माध्यमातून योगेश प्रताप सिंहच्या संपर्कात आली. या दोघांमध्ये मोबाईलाच्या माध्यमातून संवाद व्हायचा. त्यानंतर आरोपीने पीडित तरुणीला रिवा येथे हॉटेलमध्ये भेटण्यासाठी बोलवून तिच्यावर अत्याचार केला. (Instagram) त्यानंतर आरोपीने मुलीला चित्रकूट येथे नेलं. तिथेही त्याने तिच्यासोबत पुन्हा अत्याचार केला. अत्याचार करून तो तरुणीला तिथेच सोडून फरार झाला.दरम्यान, पीडितेच्या कुटंबीयांनी तक्रार दाखल केल्यानंतर आरोपीला पकडण्यात आलंय. या प्रकरणाचा पोलीस तपास करत आहेत. तसेच सोशल मीडियावर कोणाशीही चॅटिंग करताना योग्य ती काळजी घेतली घ्या, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
हेही वाचा :