भाजपाचे वरिष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांच्यावर मागच्या आठवड्यापासून रुग्णालयात(hospital) उपचार सुरू आहेत. अचानक तब्येत बिघडल्याने त्यांना मागच्या आठवड्यात दिल्लीच्या अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आलं. आडवाणी हे सध्या 97 वर्षांचे असून गेल्या काही दिवसांपासून त्यांची तब्येत खराब होती. त्यांच्यावर 12 डिसेंबरपासून दिल्लीत उपचार सुरू आहेत. त्यांच्या तब्येतीबद्दल आता मोठी अपडेट समोर आली आहे.
लालकृष्ण आडवाणी यांच्या तब्येतीमध्ये आता हळहूळ सुधारणा होत आहे. मात्र त्यांना नक्की काय होतंय याबद्दल कोणतीही माहिती देण्यात आली नाही. अशात हॉस्पिटलतर्फे(hospital) आडवणी यांच्याबद्दल हेल्थ बुलेटिन जारी करण्यात आली.
“भाजपचे ज्येष्ठ नेते आणि भारताचे माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी हे 12 डिसेंबरपासून इंद्रप्रस्थ अपोलो हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये डॉ. विनीत सुरी यांच्या देखरेखीखाली आहेत. त्यांची प्रकृती हळूहळू सुधारत आहे. त्यांच्या तब्येतीच्या प्रगतीनुसार त्यांना पुढील 1-2 दिवसांत ICU मधून हलवले जाण्याची शक्यता आहे.”, असं या बुलेटीनमध्ये सांगण्यात आलंय.
मागच्या 4-5 महिन्यात चौथ्यांदा त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या वृत्ताने राजकीय वर्तुळात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. यापूर्वी ऑगस्ट महिन्यात त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. अशात या डिसेंबर महिन्यात पुन्हा आडवाणी यांची तब्येत बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.
याच वर्षी लालकृष्ण आडवाणी यांना देशाचा सर्वोच्च सन्मान भारतरत्न देखील प्रदान करण्यात आला. प्रकृतीच्या समस्येमुळे ते राष्ट्रपती भवनातील कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाहीत. त्यांना त्यांच्या निवासस्थानीच भारतरत्न प्रदान करण्यात आला. मागील महिन्यात 8 नोव्हेंबररोजी त्यांचा वाढदिवस होता. यानिमित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट देत त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या.
दरम्यान, लालकृष्ण अडवाणी यांनी भारतीय जनता पक्षाच्या स्थापनेपासून (6 एप्रिल 1980) प्रदीर्घ काळ पक्षाचे अध्यक्ष म्हणून काम केले आहे. त्यांनी अटलबिहारी वाजपेयी सरकारमध्ये 1999 ते 2005 पर्यंत भारताचे गृहमंत्री आणि उपपंतप्रधान म्हणून काम केले. 2009 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने त्यांना पंतप्रधान पदाचा चेहरा म्हणून घोषित केले होते. मात्र, तेव्हा भाजपाला यश मिळाले नव्हते.
हेही वाचा :
भारताला धक्काच! ‘लापता लेडिज’ ऑस्करच्या शर्यतीतून बाद
महायुती सरकारच्या खातेवाटपाचं अखेर ठरलं?; ‘हा’ मोठा बदल केला जाणार
पोटावर वाढलेली चरबी आणि वजन कमी करण्यासाठी प्रभावी ठरतील ‘ही’ हिरवी पाने, नियमित करा सेवन