समर स्पेशलमुळे लोकल सेवा विलंबाने; मुंबईकर त्रस्त

गेल्या काही दिवसांपासून जलद मार्गावरील लोकल सेवा १० ते १५ मिनिटे(minutes) विलंबाने धावत आहे.त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे.


उन्हाळ्यातील गर्दी विभागण्यासाठी मध्य रेल्वेवरून कोकणासह पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर भारतात विशेष रेल्वेगाड्या चालवण्यात येत आहे. मात्र या गाड्या विलंबाने धावत असल्याने त्याच्या थेट परिणाम उपनगरीय लोकलला बसत आहे.गेल्या काही दिवसांपासून जलद मार्गावरील लोकल सेवा १० ते १५ मिनिटे(minutes) विलंबाने धावत आहे.त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे.
उन्हाळी सुट्टी आणि देशभरातील लोकसभा निवडणूकायांमुळे यंदा भारतीय रेल्वेकडून देशात ९ हजार १११ विशेष एक्स्प्रेस फेऱ्या चालवण्यात येत आहे. सर्वाधिक १ हजार ८७८ फेऱ्या पश्चिम रेल्वेवरून आणि मध्य रेल्वेवरून ४८८ फेऱ्या चालवण्यात येत आहेत.

गतवर्षी उन्हाळी सुट्टीत ६ हजार ३६९ फेऱ्या देशभरात धावल्या होत्या.तसेच उन्हाळी विशेष गाड्यांची संख्या वाढतच आहे. विशेष म्हणजे नियमित आणि विशेष गाड्यांचे वेळा पाळण्यास रेल्वेला अपयश येत आहे.


अनेक मेल- एक्सप्रेस रेल्वे गाड्या वेळेवर धावत नसल्याने उन्हाळी विशेष गाड्यांचा वेळापत्रकावर परिणाम होत आहे. मुंबईत येणाऱ्या मेल- एक्सप्रेस गाड्या आपल्या निर्धारित वेळेत येत नसल्याने उपनगरीय लोकल सेवांच्या वेळापत्रकावर परिणाम पडत आहे.

मध्य रेल्वेकडून उन्हाळी विशेष गाडयांना मार्गिका उपलब्ध करून देण्यासाठी लोकल सेवा थांबून ठेवत असल्याने लोकल सेवा विलंबाने धावत आहे. त्यामुळे प्रवाशांना लोकल गर्दीचा सामना करावा लागत आहे. विशेष म्हणजे प्रवाशांना कार्यलयात पोहचण्यास विलंब होत असल्याने रेल्वेच्या कारभावर प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे.

हेही वाचा :

पंतप्रधान नरेंद्र मोदी दुसऱ्यांदा तपोवन वर

टीम इंडियाच्या वर्ल्ड कप संघातून हार्दिक पांड्याला डच्चू?

दिल्ली उच्च न्यायालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात याचिका; आज होणार सुनावणी