बॉलीवूड असो की साऊथ इंडस्ट्री, अभिनेत्री असो की अभिनेते, त्यांची नावे कोणाशी(dhoni) ना कोणाशी जोडली जातात. कधी कानावर येणाऱ्या गोष्टी खऱ्या असतात तर कधी अफवांच्या लाटेत तरंगणाऱ्या बातम्या असतात. अशीच कहाणी आहे चेन्नई सुपर किंग्जचा थाला महेंद्रसिंग धोनी आणि राय लक्ष्मीची. दोघांचे हे प्रकरण तुम्हाला माहीत नाही का? जर तुम्हाला हे प्रकरण माहित नसेल तर तुम्ही स्वत:ला धोनीचे कट्टर चाहते म्हणवून घेऊच शकत नाही.
पण असे काय झाले की साऊथ अभिनेत्री लक्ष्मीने तिच्या आणि माहीच्या(dhoni) नात्याला एक ‘डाग’ असे म्हटले? जुन्या रिलेशनशिपचा खरोखरच आपल्या जीवनावर खोलवर परिणाम होतो का? चाल आज या प्रश्नाचे उत्तर शोधुया.
2008 मध्ये आयपीएलच्या पहिल्या सिझन वेळी राय लक्ष्मी चेन्नई सुपर किंग्ज संघाची ब्रँड ॲम्बेसेडर होती. या काळात तिच्या आणि धोनीच्या भेटीगाठींचा सिलसिलाही वाढला. त्यांचे नाते कधी सुरू झाले आणि कधी संपले हे कोणालाच माहीत नाही. माहीने तिच्या नात्याबद्दल कधीच उघडपणे काहीही सांगितले नाही, परंतु असे म्हटले जाते की ब्रेकअपनंतर लक्ष्मीने तिच्या एका मुलाखतीत धोनीसोबतच्या रिलेशनशिपला एका डागाची उपमा दिली होती त्याबद्दल बिनधास्त तिने कमेंटही केली होती.
साउथच्या या अप्सरेने तिच्या आणि धोनीच्या नात्याबाबत अनेक विधाने केली आहेत. जसे की लक्ष्मीने एका मुलाखतीदरम्यान सांगितले होते की, “धोनीसोबतचे माझे नाते एका डागासारखे आहे जे पुसूनही जाणार नाही. तसेच, लोकांमध्ये अजूनही इतकी एनर्जी शिल्लक आहे की ते त्याबद्दल बोलतच असतात. कधीतरी माझी मुलं टीव्हीवर हे पाहतील आणि मला त्याबद्दल विचारतील, अशी मला भीती वाटते.” एकदा ज्युली 2 चित्रपटाच्या प्रमोशनच्या वेळी लक्ष्मी म्हणाली होती की, “आम्ही दोघांनी कधीही कोणतीही कमिटमेंट केली नाही आणि लग्नाचा विचारही केला नाही.”
मीडियामध्ये त्यांच्या नात्याबाबत कोणताही ठोस पुरावा नाही, पण आता माही(dhoni) आणि लक्ष्मी दोघेही आपापल्या आयुष्यात आनंदी आहेत. पण जुनी नाती मग ती खरी असो वा खोटी, आपल्या भविष्यावर कोणत्या ना कोणत्या नात्याने परिणाम करत असल्याचे अनेकदा दिसून येते. तुम्ही कितीही गोष्टी विसरून पुढे जाण्याचा प्रयत्न केला तरी लोक तुम्हाला काहीही विसरू देत नाहीत. जाणून घेऊया जुन्या नात्यांचा आपल्या आयुष्यावर काय परिणाम होतो?
सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या आणि तुमच्या जोडीदाराच्या नात्यात विश्वास असायला हवा आणि तुमच्या दोघांमध्ये समजूतदारपणा असायला हवा, जेणेकरून तुमच्या नात्यात कोणताही जुना मुद्दा आला तर तो शांतपणे बोलून सोडवता येईल. अन्यथा, तुमचे जुने प्रकरण आणि नातेसंबंध आजच्या नात्यात दुरावा निर्माण करू शकतात.
मुलं त्यांच्या पालकांकडूनच शिकतात आणि तुमची जुनी नाती नंतर तुमच्या मुलांसमोर आली तर कदाचित तुम्हाला ते सहन करणं खूप कठीण जाईल. त्यामुळे तुमच्या जोडीदारासोबतचे नाते संपवण्याआधी त्यांच्याशी असलेले सर्व मतभेद दूर करण्याचा प्रयत्न करा आणि मगच तुमच्या आयुष्यात पुढे जा.
हेही वाचा :
शिंदेंची मोठी खेळी, ठाकरेंच्या निकटवर्तीयाला उमेदवारी जाहीर
इचलकरंजीत उद्या उद्धव ठाकरे, शरद पवार, बाळासाहेब थोरात याची जाहीर सभा
प्रचार की डान्स शो? धैर्यशील माने यांच्या प्रचारात चक्क गोविंदाचे ठुमके!