कणकवलीतील सभेमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करणाऱया मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा शिवसेना नेते-खासदार (mp)संजय राऊत यांनी आज समाचार घेतला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडून महाराष्ट्राची लूट केली जातेय, त्यावर राज ठाकरे आणि राणे जोडीने तोंड उघडले का, असा खोचक सवाल संजय राऊत यांनी केला.(mp)
‘महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातला पळवायचे आणि महाराष्ट्राचा विध्वंस आणि विनाश करणारे प्रकल्प आमच्या माथी मारायचे. आमच्या शेती, फळबागा, जमीन याचे नुकसान करायचे. सध्या मोदी-शहांचे नवीन भक्त झालेले खरोखर महाराष्ट्राचे सुपुत्र आहेत का? याचे त्यांनी आत्मचिंतन केले पाहिजे,’ असा टोला संजय राऊत यांनी लगावला. हे नकली अंधभक्त आहेत, उद्या त्यांची भक्ती बदलू शकते, असेही खासदार राऊत म्हणाले.
नारायण राणे यांनी मोदींच्या मंत्रिमंडळात काय दिवे लावले याचा खुलासा त्यांची वकिली करणाऱया नेत्यांनी करावा. पक्षांतरे करून मंत्रीपद घेणे हा विकास आहे का असा सवाल करतानाच, मौनी खासदाराचे समर्थन करणे मनसे प्रमुखांची मजबुरी आहे, अशी टीकाही यावेळी संजय राऊत यांनी केली.
हेही वाचा :
रोहित पवारांना धक्का! कट्टर समर्थकाने सोडली साथ; अजित पवार गटात प्रवेश
धक्कादायक आता आणखी एका ठिकाणी काँग्रेस उमेदवाराचा निवडणूक लढण्यास नकार
राजू शेट्टींच्या प्रचारासाठी बच्चू कडू मैदानात; जाहीर सभेत म्हणाले, हिंदू-मुस्लिम संकटात नाहीत तर..