देश जागा झालाय… दिल्लीच्या खुर्चीखाली मतांचा बॉम्ब फुटणारच

मोदी, शहांना पराभवाचे भूत दिसू लागले म्हणून त्यांनी आधी ‘राम राम राम राम’ केले. त्यानंतर हिंदू विरुद्ध मुसलमान(muslims) हेही करून झाले. पण त्यातून काही निष्पन्न होत नाही हे पाहून आता निवडणुकीनंतर कुठे फटाके फुटणार.. हिंदुस्थानात की पाकिस्तानात? असे मथळे असलेल्या जाहिराती छापून पुन्हा पाकिस्तानची भीती दाखवू लागले आहेत.

पण मोदीजी.. तुमच्या धोतरात चीन घुसलाय आणि तुम्ही आम्हाला पाकिस्तानची(muslims) भीती कसली दाखवताय, असा सवाल करतानाच तुमचे जुमले आता चालणार नाहीत. देशाला जाग आली आहे. तुमच्या दिल्लीच्या खुर्चीखाली मतांचा बॉम्ब फुटणारच, असा जबरदस्त घणाघात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला. ‘हातात आहे मशाल आणि विजय होणार विशाल’ असा नारा उद्धव ठाकरे यांनी दिला तेव्हा अलिबागचे जेएसएम मैदान आणि ऐरोलीचे श्रीराम विद्यालय मैदान शिवसेना झिंदाबाद.. इंडिया आघाडीचा विजय असो अशा गगनभेदी घोषणांनी दणाणून गेले.
रायगड लोकसभा मतदारसंघाची निवडणूक 7 मे रोजी होणार आहे. आज प्रचाराच्या अखेरच्या दिवशी शिवसेना इंडिया आघाडीचे उमेदवार अनंत गीते यांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे यांची भव्य सभा अलिबागच्या जेएसएम मैदानावर झाली. त्यानंतर ठाणे लोकसभेचे शिवसेना उमेदवार राजन विचारे यांच्या प्रचारासाठी त्यांची सभा ऐरोलीतील श्रीराम विद्यालयाच्या प्रांगणात झाली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी मतांसाठी फुटपाडे राजकारण करणारा भाजप, मोदी-शहा, मिंधे आणि अजित पवार गटावर जबरदस्त वज्राघात केला. आयपीएलमध्ये जसे बोली लावून खेळाडू पळवतात तसे महाराष्ट्राच्या राजकारणात भाजपने बोली लावून गद्दार पळवले आहेत. महाराष्ट्र आणि रायगड ही छत्रपती शिवरायांची भूमी आहे, शूरांची भूमी आहे. म्हणून आम्ही शूरा मी वंदिले असे म्हणतो. पण भाजपवाले चोरा मी वंदिले म्हणतात, असे तडाखे उद्धव ठाकरे यांनी लगावले. दहा वर्षांत लोकांची कामे केली असती तर ही फोडाफोडीची वेळच आली नसती, असे खडेबोलही त्यांनी सुनावले.
महाराष्ट्रावर दोन वक्रीवादळे घोंघावताहेत
मी मुख्यमंत्री असताना कोकणाने तौक्ते आणि निसर्ग अशा दोन चक्रीवादळांचा सामना केला. ती दोन चक्री वादळे होती. पण महाराष्ट्रावर मोदी, शहा ही वक्रीवादळे घोंघावताहेत. महाराष्ट्रासह कोकणवासी या वक्रीवादळांचा पक्का बंदोबस्त करतील, असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.

तुम्ही संकट बनून माझ्यावर आला आहात
मध्येच मोदींना माझ्याबद्दल काय प्रेम आलं देव जाणे. म्हणे उद्धव ठाकरेंवर संकट आलं तर आम्ही मदतीला जाऊ. अरे, तुम्ही संकट आणून बघाच हे सुरक्षा कवच (समोर गर्दीकडे बोट दाखवून) माझ्यासोबत आहे. मोदीजी मला तुमच्या सुरक्षेची गरज नाही. माझे आईवडील आणि आई जगदंबेच्या सुरक्षेचे कवच माझ्याभोवती आहे आणि तुम्हीच संकट बनून माझ्यावर आला आहात, असे जोरदार तडाखे उद्धव ठाकरे यांनी लगावले.

म्हाळगी प्रबोधिनीतल्या कुंथन शिबिराचे काय झाले?
आमच्यातल्या गद्दारांना घेऊन तुम्ही असली शिवसेना म्हणून मिरवताय. आमची पोरं पळवता, वडील पळवता मग तुमचं कर्तृत्व काय? तुमची जी म्हाळगी प्रबोधिनी आहे तिथे कार्यकर्ते घडवण्यासाठी चालणाऱया चिंतन, कुंथन शिबिराचं काय झालं. तिथली माणसं कुठे गेली, असा खडा सवाल उद्धव ठाकरे यांनी भाजपला केला.

हेही वाचा :

नितीन गडकरी अंबाबाई चरणी; नेमकं काय घातलं साकडं?

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि आम. आवाडे यांच्यात गुफ्तगू…!

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज शनिवारपासून दोन दिवस कोल्हापूर दौऱ्यावर