कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीमध्ये राज्यामध्ये जसा महायुतीने मतांचा विक्रम केला, तसाच विक्रम कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा घडून आला आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये घडतं त्याचा संदेश राज्यामध्ये दिला जातो, असे नेहमीच म्हटले जाते. महायुतीच्या विजयामध्ये सुद्धा तसेच घडून आलं आहे. जिल्ह्यातील दहापैकी दहा विधानसभा मतदारसंघांमध्ये महायुतीचे उमेदवारांनी(candidates) विजय खेचून आणला. या सर्व विजय उमेदवारांची मतदानाची टक्केवारी सरासरी 51 ते 54 टक्क्यांच्या घरात राहिली आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील लाडक्या बहिणींनी महायुतीच्या उमेदवारांना(candidates) एकहाती साथ दिल्याचे दिसून येत आहे. मात्र, पोस्टल मतदानामध्ये महाविकास आघाडीने बाजी मारल्याचं दिसून येत आहे. पोस्टल मतदानामध्ये कोल्हापूर जिल्ह्यात दहापैकी सहा विधानसभा मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारांना पोस्टल मतदान सर्वाधिक मिळालं आहे. कोल्हापूर जिल्ह्यात समरजितसिंह घाटगे, प्रकाश आबिटकर आणि ऋतुराज पाटील यांना सर्वाधिक पोस्टल मते मिळाली आहेत. मात्र, घाटगे यांचा कागलमध्ये निकराच्या लढतीत पराभव झाला, तर दक्षिणमध्ये ऋतुराज पाटील यांचा दारुण पराभव झाला.
कागल विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे समरजितसिंह घाटगे यांना पोस्टल मतदानामध्ये १७३९ मते मिळाली आहेत. त्यांचे कट्टर विरोधक हसन मुश्रीफ यांना १४४१ मते मिळाली आहेत. दुसऱ्या क्रमांकावर कोल्हापूर दक्षिणचे काँग्रेसचे उमेदवार ऋतुराज पाटील यांचा समावेश आहे. त्यांना १६०६ मते मिळाली आहेत. भाजप उमेदवार अमल महाडिक यांना ८९९ मते मिळाली आहेत. त्यामुळे जवळपास दुप्पट पोस्टल ऋतुराज पाटील यांना मिळाली आहेत.
दरम्यान, राज्यातील सर्वाधिक मतदान करवीर विधानसभा मतदारसंघामध्ये झाले होते. करवीरमध्ये ८४.९६ टक्के मतदान झाले होते. त्यामुळे या मतदारसंघाकडे राज्याचे लक्ष लागून राहिलं होतं. या मतदारसंघांमध्ये शिवसेना शिंदे गटाचे माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी पुन्हा एकदा आमदारकी खेचून आणली. त्यांना पोस्टल मते ९८३ मिळाली. मात्र, पोस्टल मतांमध्ये पराभूत राहुल पाटील यांनी आघाडी घेतल्याचे दिसून येते. त्यांना १५८३ मते मिळाली आहेत.
इचलकरंजीमध्ये पोस्टल आणि ईव्हीएम अशा दोन्ही ठिकाणी राहुल आवाडे यांनी आघाडी घेतल्याचे दिसून आले. राहुल आवाडे यांनी जिल्ह्यातील सर्वात मोठा विजय खेचून आणतानाच पोस्टल मतांमध्येही त्यांना सर्वाधिक ४९७ मते मिळाली. त्यांच्या विरोधातील मदन कारंडे यांना पोस्टल मतदानामध्ये ४७९ मतदान झालं आहे. राजेंद्र पाटील यांनी सुद्धा शिरोळ विधानसभा मतदारसंघांमध्ये मोठा विजय मिळवला. मात्र, पोस्टल मतदानामध्ये गणपतराव पाटील सरस ठरले आहेत. त्यांना ९७२ मते मिळाली. उल्हास पाटील यांना २०० मते मिळाली.
हेही वाचा :
चहा की कॉफी? हिवाळ्यात आरोग्यासाठी कोणतं पेय ठरेल गुणकारी
26/11 हल्ल्याला 16 वर्षे पूर्ण! दहशतवादी हल्ल्यातील हे 5 गुन्हेगार कुठे आहेत?
मल्लिका शेरावतने फ्रेंच बॉयफ्रेंड सिरिल ऑक्सेनफॅन्स सोबत केला ब्रेकअप