महिंद्राने देशात अनेक उत्तम एसयूव्ही ऑफर केल्या आहेत. कंपनीने BE 6 आणि XEV 9e(company) या इलेक्ट्रिक एसयूव्ही देखील लाँच केल्या आहे. आता कंपनी याच्या Pack Two व्हेरिएंटची जुलै 2025 अखेरीस डिलिव्हरी सुरु करणार आहे.

भारतीय ईव्ही बाजारपेठेत महिंद्रा इलेक्ट्रिक SUV विभागाने आपल्या नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान व डिझाइनमुळे अग्रणी स्थान प्राप्त केले आहे. ग्राहकांकडून मिळालेल्या जोरदार प्रतिसादामुळे BE 6 आणि XEV 9e च्या Pack Two व्हेरिएंटचे वितरण जुलैअखेरपासून सुरू होणार आहे. BE 6 Pack Two ची प्रारंभिक (company) किंमत ₹21.90 लाख (59 kWh) असून ₹23.50 लाख (79 kWh) पासून सुरू होते. XEV 9e Pack Two साठी ही किंमत अनुक्रमे ₹24.90 लाख आणि ₹26.50 लाख आहे (सर्व किंमती एक्स-शोरूम).
संपूर्ण चार्जनंतर BE 6 कार 500 किमी आणि XEV 9e कार 400 किमी रेंज मिळते. दोन्ही मॉडेल्समध्ये 175 kW/140 kW DC फास्ट चार्जिंगची क्षमता असून फक्त 20 मिनिटांत 20% ते 80% पर्यंत चार्ज करता येते. 59 kWh मॉडेलमध्ये 170 kW तर 79 kWh मॉडेलमध्ये 210 kW मोटर असून यामध्ये बूस्ट मोड, सिंगल पेडल ड्राइव्ह, मल्टी-स्टेप रिजनरेशन आणि SonicSuit व्हर्च्युअल इंजिन साउंड यासारख्या प्रगत वैशिष्ट्यांचा समावेश आहे.
डिझाइन
BE 6 मध्ये Race-Ready Digital Cockpit, प्रीमियम सेज लेदर इंटेरियर्स व आयव्हरी रूफ फिनिश असून XEV 9e मध्ये ट्रिपल स्क्रीन वाइड सिनेमास्कोप, टायटॅनियम टच डॅश व कोस्ट-टु-कोस्ट(company) डिस्प्ले दिले आहेत. दोन्ही मॉडेल्समध्ये Illuminated लोगो, Fixed Infinity Roof, R19 अलॉय व्हील्स, Bi-LED DRLs, स्टार्ट-अप लाइटिंग सिक्वेन्स आणि सिक्वेन्शियल इंडिकेटर्स यांचा समावेश आहे.
सेफ्टी फीचर्स
दोन्ही कार्समध्ये 6 एअरबॅग्स, ऑल-व्हील डिस्क ब्रेक्स, L2 ADAS, इंटेलिजंट ब्रेक बूस्टर, इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक, फ्रंट आणि रिअर पार्किंग सेन्सर्स, HD कॅमेरा, TPMS आणि ऑटो डिफॉगर यासारखी 46 मूल्यवर्धित सेफ्टी फीचर्स देण्यात आली आहेत.
टेक्नॉलॉजी
Qualcomm Snapdragon चिपसेटवर आधारित सिस्टम, 16-स्पीकर हार्मन/कार्डन साउंड सिस्टम, डॉल्बी अटमॉस, वायरलेस Android Auto व Apple CarPlay, 5G कनेक्टिव्हिटी, Amazon Alexa, प्री-इन्स्टॉल्ड OTT, BYOD इन-कार एक्सपीरियन्स, शेड्युल्ड चार्जिंग, आणि केबिन प्रीकूलिंग अशा सुविधा आहेत.
कम्फर्ट
आरामदायीपणा आणि सोयीसाठी, Dual Zone Climate Control, Cooled Console Storage, Rain Sensing Wipers, Electrically Adjustable Seats, 60:40 Split Seats, Wireless Charging, Acoustic Door Glass, Rear AC Vents, टोनो कव्हर, आणि प्रशस्त फ्रंक व ट्रंक यांचा समावेश आहे.
महिंद्राचे देशभर 300 हून अधिक सर्व्हिस टचपॉइंट्स कार्यरत आहेत. Pack Two च्या रूपात महिंद्राने इलेक्ट्रिक वाहतुकीतील पुढील पाऊल भक्कमपणे टाकले असून, ग्राहकांना त्यांच्या गरजेनुसार अधिक स्मार्ट, सुरक्षित आणि प्रीमियम अनुभव मिळणार आहे.
हेही वाचा :
सकाळच्या नाश्त्यात १० मिनिटांमध्ये झटपट बनवा खमंग कोथिंबीर पराठा, नाश्ता होईल पोटभर
धबधब्याच्या काठावर उभा राहून गर्लफ्रेंडला प्रोपोज करत होता, तितक्यात पाय घसरला अन्…Video
‘…तर तुझ्या पत्नीला माझ्या घरी आणून सोड’; दुकानदाराने सावकाराच्या जाचाला कंटाळून जीवन संपवलं