ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांच्या आंदोलनाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(developments) यांनी पाठवलेल्या गिरीश महाजन, उदय सामंत, गोपीचंद पडळकर आणि अतुल सावे यांच्या शिष्टमंडळाने भेट घेतली. लक्ष्मण हाके आणि शिष्टमंडळासमोर यांच्यात चर्चा सुरू असताना आंदोलनस्थळी असलेले कार्यकर्ते आक्रमक झाले. त्यामुळे गोंधळ उडाला.
जोरदार घोषणाबाजी केली. आंदोलक शिष्टमंडळासमोर(developments) ज्या मागण्या मांडत होते, तसा समोरील कार्यकर्ते ‘एकच गर्व, ओबीसी सर्व’, अशी घोषणाबाजी करत होते. दरम्यान लक्ष्मण हाके आंदोलनावर ठाम राहिले.
लक्ष्मण हाके आणि शिष्टमंडळांमध्ये सुरूवातीला प्राथमिक चर्चा झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाठवलेल्या शिष्टमंडळातील उदय सामंत आणि गिरीश महाजन यांनी लक्ष्मण हाके यांच्याशी सुरवातीला चर्चा केली. गिरीश महाजन यांनी ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही. चर्चेसाठी हाकेंनी शिष्टमंडळ मुंबईला पाठवावे.
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सकारात्मक निर्णय घेतील, असे आश्वासन दिले. लक्ष्मण हाके यांनी यावर ओबीसी आणि सगेसोयरे याची भूमिका स्पष्ट करावी. सरकारने काय खरे ते सांगावं. मनोज जरांगे म्हणतात की, आम्ही ओबीसीमध्ये आलो. कोण खरं बोलत आहे, मनोज जरांगे की, सरकार हे स्पष्ट करावे, अशी मागणी केली.
हेही वाचा :
मुलं शाळेत अन् शिक्षक बदलीसाठी कोल्हापुरात
पेट्रोल डिझेलचे नवे दर जाहीर; एक लिटरसाठी किती रुपये मोजावे लागणार?
शिंदे सरकारकडून महिलांना मिळणार मोठं गिफ्ट? विधानसभा निवडणुकीपूर्वी राबवणार खास योजना