सकाळच्या नाश्त्यात लहान मुलांसाठी झटपट बनवा चविष्ट क्रीम सँडविच, नोट करून घ्या रेसिपी

लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं सँडविच खायला खूप(today’s news) जास्त आवडते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सकाळच्या नाश्त्यात मलाई सँडविच बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत.

लहान मुलांसाठी सकाळच्या नाश्त्यात नेहमी नेहमी काय बनवावे? हे बऱ्याचदा सुचत नाही. नाश्त्यात कांदापोहे, उपमा, शिरा किंवा इतर इडली, डोसा खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याचा लहान मुलं हट्ट करतात. लहान मुलांना नेहमीच बाहेर विकत मिळणारे चमचमीत पदार्थ खाण्यास हवे असतात. पण सतत तेलकट किंवा तिखट पदार्थ खाल्यामुळे आरोग्याला हानी पोहचण्याची शक्यता असते. म्हणूनच आज आम्ही(today’s news) तुम्हाला लहान मुलांच्या नाश्त्यासाठी झटपट चविष्ट क्रीम सँडविच बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. सँडविच हा पदार्थ लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं खूप जास्त आवडतो. वेगवेगळ्या भाज्या, सॉस आणि चीज इत्यादी पदार्थांचा वापर करून बनवलेला पदार्थ आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक आहे. लहान मुलं भाज्या खाण्यास बऱ्याचदा नकार देतात. अशावेळी मुलांना सँडविच बनवून द्यावे. चला तर जाणून घेऊया चविष्ट क्रिमी सँडविच बनवण्याची सोपी रेसिपी.

भाजी काय बनवावी सुचत नाही? ५ मिनिटांमध्ये झटपट बनवा चमचमीत कांद्याची चटणी, नोट करा रेसिपी

साहित्य:
ब्रेड
शिमला मिरची
फ्रेश क्रीम
टोमॅटो सॉस
टोमॅटो
कांदा
हिरवी मिरची
चीज
बटर
मीठ
काळीमिरी पावडर
संध्याकाळचा नाश्ता थोडा चिजी होऊन जाऊद्यात; घरी बनवा सर्वांच्या आवडीचा Mac And Cheese

कृती:
मलाई सँडविच बनवण्यासाठी सर्वप्रथम, मोठ्या भांड्यात (today’s news) बारीक चिरलेला कांदा, सिमला मिरची, टोमॅटो, हिरवी मिरची घेऊन व्यवस्थित मिक्स करा.
त्यानंतर त्यात मीठ आणि काळी मिरी पावडर घालून मिक्स करा.
तयार केलेल्या मिश्रणात फ्रेश क्रीम टाका. सँडविच किंवा इतर पदार्थ बनवताना फ्रेश क्रीमचा वापर करावा.
ब्रेडच्या स्लाइसवर टोमॅटो सॉस लावून त्यावर तयार केलेले मिश्रण ठेवून वरून दुसरा ब्रेड स्लाइस ठेवून घ्या.
गरम तव्यावर तयार केलेले सँडविच ठेवून थोडेसे बटर टाकून दोन्ही बाजूने व्यवस्थित कुरकुरीत भाजून घ्या.
भाजून घेतलेल्या सँडविचचे दोन तुकडे करून खाण्यासाठी सर्व्ह करा. तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले मलाई सँडविच.

हेही वाचा :

YouTube वर पैसे कमवणे आता अवघड! नियम बदलले, वाचा सविस्तर

घरात कडाक्याच भांडण झालं, नवऱ्याने रागारागात चौथ्या मजल्यावरुन उडी मारली; जागीच मृत्यू VIDEO VIRAL

शिवसेना पक्ष आणि चिन्हावर ‘या’ तारखेला सुप्रीम कोर्टात सुनावणी; महाराष्ट्राचे लक्ष या निर्णयाकडे