संडे स्पेशल नाश्त्याला बनवा ब्रेड चीज पकोडा

रविवारी घरातील सर्व सदस्यांना सुट्टी असते. आता सुट्टी म्हटल्यावर नाश्त्याला(Breakfast) काय बनवावे असा प्रश्न अनेकांना पडतो. त्यासाठी आम्ही आज तुम्हाला ब्रेड चीज पकोडा घरच्याघरी कसा बनवायचा याची रेसिपी सांगणार आहोत.

ब्रेड पकोडे(Breakfast) सर्वांनाच आवडतात. त्यात चीज असेल तर मग लहान मुलं सुद्धा मोठ्या आवडीने खातात. ब्रेड चीज पकोडा खाण्यासाठी फारच स्वादिष्ट लागतो. नाश्ता आणि स्नॅक्स म्हणून सुद्द्धा तुम्ही ब्रेड चीज पकोडा खाऊ शकता. चला तर मग याची झटपट रेसिपी जाणून घेऊ.

साहित्य

बेसन

लाल तिखट

हळद

कसुरी मेथी

जिरे पावडर

मीठ

तेल

हिरवी मिरची

अद्रक

लसूण

कडीपत्ता

कांदा

बटाटा

चीज

ब्रेड

चाट मसाला

कृती

सर्वात आधी कांदा बारीक चिरून घ्या. कांदा चिरल्यानंतर एका वाटीत बेसन पीठ काढून घ्या. या पिठात तुमच्या आवडीनुसार तिखड, मीठ टाकून घ्या. हे मिश्रण छान एकजीव करा. त्यानंतर त्यात पाणी मिक्स करून छान बॅटर तयार करून घ्या.

पुढे बटाटे शिजवून घ्या. त्यानंतर एका कढईत तेल घ्या. त्यावर जिरे, मोहरी, कडीपत्ता, मिरची, अद्रक आणि लसूण पेस्ट टाकून घ्या. तसेच नंतर यावर कांदा टाका. हे मिश्रण छान परतल्यावर त्यावर शिजलेला बटाटा कुस्करून टाका. ही झाली तुमची बटाट्याची भाजी.

आता ब्रेड घा, तुमच्या आवडीनुसार त्याचे साईडचे काठ कापून टाका. त्यानंतर तयार भाजी ब्रेडच्या मधोमध स्टफ करून घ्या. तुम्ही यासाठी दोन ब्रेड सुद्धा वापरू शकता. एका ब्रेडमध्ये भाीजी भरून दुसऱ्या ब्रेडने बंद करा. तसेत जर एकाच ब्रेडमध्ये थोडी भाजी भरून त्याच्या कडा एकमेकांवर ठेवून बंद करून घ्या. ब्रेडमध्ये भाजी स्टफ करत असताना त्यात चीज क्युब किंवा चीज किसून टाकून घ्या.

पुढे एका कढईत तेल तापण्यासाठी ठेवा. त्यानंतर प्रत्येक पकोडा या तेलात तळून घ्या. तळण्याचे काम सुरू असताना गॅस फ्लेम मिडिअम टू लो फ्लेमवर ठेवा. ब्रेड गोल्डन ब्राउन होईपर्यंत तळून घ्या. तयार झाला तुमचा ब्रेड पकोडा. हा ब्रेड पकोडा चवीला फार छान लागतो. तेलात तळल्यानंतर चीझ देखील यात वितळून जातं. त्यामुळे हा ब्रेड पकोडा फार छान लागतो. तुम्ही ग्रीन चटणी आणि लाल गोड खजूर चटणी सुद्धा खाऊ शकता.

हेही वाचा :

बाहेर पडताना काळजी घ्या! राज्यात ‘या’ भागात आज अतिवृष्टीचा इशारा

नंबर 2 दूर नाही… भारत बनणार जागतिक महासत्ता, अमेरिकेला धोबीपछाड

काळोख्या रात्री स्मशानात चालू ‘हे’ काम; पोलिसांच्या ताब्यात प्रीयसी-प्रियकर…