सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा चविष्ट आणि मऊ पॅनकेक, नोट करून घ्या रेसिपी

सकाळच्या नाश्त्यासाठी घाईगडबडीमध्ये तुम्ही मऊ आणि चविष्ट पॅनकेक (loves)बनवू शकता. लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं पॅनकेक खायला खूप जास्त आवडतात. चला तर जाणून घेऊया पॅनकेक बनवण्याची सोपी रेसिपी.

सकाळच्या नाश्त्यात प्रत्येकालाच काहींना काही चमचमीत आणि हेल्दी पदार्थ खाण्याची इच्छा होते. कांदापोहे, शिरा, उपमा किंवा इतर पदार्थ खाऊन कंटाळा येतो. सकाळच्या वेळी पोटभर नाश्ता करणे आवश्यक आहे. नाश्ता केल्यामुळे संपूर्ण दिवस आनंद आणि उत्साहामध्ये जातो. कारण झोपेतून उठल्यानंतर शरीराची ऊर्जा काहीशी कमी होऊन जाते. त्यामुळे पोटभर नाश्ता केल्यास शरीरात ऊर्जा कायम टिकून राहील. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सकाळच्या नाश्त्यासाठी चविष्ट मऊ पॅनकेक बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. लहान मुलांपासून अगदी (loves)मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं पॅनकेक खायला खूप जास्त आवडतात. पॅनकेकचे नाव ऐकल्यानंतर सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटते. मेपल सिरप, मध किंवा फळांच्या सॉसचा वापर करून बनवलेला पॅनकेक चवीला अतिशय सुंदर लागतो. चला तर जाणून घेऊया पॅनकेक बनवण्याची सोपी रेसिपी.

श्रावणातील पहिल्या सोमवारी नैवेद्यासाठी झटपट बनवा साबुदाणा रबडी, दिवसभराचा थकवा होईल दूर

साहित्य:
मैदा
साखर
बेकिंग सोडा
मीठ
दूध
अंडे
वितळलेले लोणी
व्हॅनिला एसेन्स
बेकिंग पावडर
नाश्त्यात हवा आहे हेल्दी पदार्थ! सोप्या पद्धतीमध्ये बनवा क्रिमी पालक स्मूदी, नोट करा रेसिपी

कृती:
पॅनकेक बनवण्यासाठी सर्वप्रथम, मोठ्या बाऊलमध्ये मैदा, साखर, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा आणि चवीनुसार मीठ घेऊन व्यवस्थित मिक्स करा.
चाळणीच्या सहाय्याने पीठ व्यवस्थित चाळून घ्या. जेणेकरून पिठात(loves) गुठळ्या राहणार नाहीत.
दुसऱ्या भांड्यात वाटीमध्ये दूध, अंडी, वितळलेले बटर आणि व्हॅनिला एसेन्स घेऊन व्यवस्थित मिक्स करा.
तयार केलेल्या मिश्रणात हळूहळू अंड्याचे मिश्रण टाकून मिक्स करा. पीठ मिक्स करताना चमच्यांचा वापर करावा.
पॅनकेक बनवण्यासाठी पॅनमध्ये बटर टाकून तयार केलेल्या पिठाचे छोटे छोटे पॅनकेक बनवून दोन्ही बाजूने व्यवस्थित भाजून घ्या.
तयार आहेत सोप्या पद्धतीमध्ये मऊ चविष्ट पॅनकेक.पॅनकेक सर्व्ह करताना त्यावर मध टाकावे.

हेही वाचा :

महेंद्रसिंग धोनीचा हा शर्ट आहे iPhone पेक्षाही महाग, किंमत ऐकाल तर हैराण व्हाल

उत्तराखंडला टक्कर देणारे महाराष्ट्रातील छुपं पर्यटनस्थळ! सातपुडा पर्वत रांगेतील तोरणमळा

समोसा-जलेबीवरही ‘सिगारेटसारखी’ आरोग्य चेतावनी; नागपूरच्या दुकानांमध्ये लावले जाणार फलक