अंड्याचा वापर न करता सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा केळीचे पॅनकेक, मोठ्यांनाही आवडेल पदार्थ

लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं पॅनकेक खायला(pancakes) खूप जास्त आवडतात. वेगवेगळ्या फळांचा वापर करून पॅनकेक बनवले जातात. म्हणून आज आम्ही तुम्हाला केळी पॅनकेक बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत.

सकाळच्या नाश्त्यात नेहमीच ठराविक पदार्थ खाण्याचा सगळ्यांचं कंटाळा येतो. नाश्त्यात प्रत्येकाला काहींना काही चमचमीत आणि हेल्दी पदार्थ खाण्यास हवे असतात. नाश्त्यात कांदापोहे, उपमा,(pancakes) शिरा किंवा डोसा खाऊन कंटाळा येतो. अशावेळी नाश्त्यात नेमकं काय बनवावं? हा प्रश्न सर्वच महिलांना पडतो. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सकाळच्या नाश्त्यात अंड्याचा वापर न करता केळीची पॅनकेक बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. केळी खाणे आरोग्यासाठी आरोग्यासाठी अतिशय गुणकारी आहे. यामध्ये असलेल्या घटकांमुळे शरीराला ऊर्जा मिळते. याशिवाय पॅनकेक तुम्ही लहान मुलांच्या डब्यात किंवा बाहेर फिरायला जाताना घेऊन जाऊ शकता. बऱ्याचदा लहान मुलांना केळी खायला आवडत नाही. चवीला गोड असलेली केळी अनेक लोक खात नाहीत. अशावेळी तुम्ही पॅनकेक किंवा इतर पदार्थ बनवून मुलांना खाण्यास देऊ शकता. चला तर जाणून घेऊया रेसिपी.

शरीरातील ऊर्जा कायम टिकून ठेवण्यासाठी सोप्या (pancakes) पद्धतीमध्ये घरी बनवा मावा लस्सी, नोट करून घ्या चविष्ट पदार्थ

साहित्य:
केळी
मैदा
साखर
बेकिंग सोडा
दूध
मीठ
बटर
उपवासाच्या दिवशी शरीरातील कमी झालेली ऊर्जा वाढवण्यासाठी नाश्त्यात बनवा रताळ्याचा किस, नोट करून घ्या रेसिपी

कृती:
केळी पॅनकेक बनवण्यासाठी सर्वप्रथम, केळीची साल काढून बारीक तुकडे करा आणि चमच्याने केळी मॅश करून घ्या.
मोठ्या वाटीमध्ये मॅश केलेली केळी, मैदा आणि चवीनुसार मीठ टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्या.
नंतर त्यात तुमच्या आवडीनुसार पिठीसाखर आणि बेकिंग सोडा टाका. हे सर्वच साहित्य मिक्स करून झाल्यानंतर त्यात दूध टाकून पॅनकेकचे मिश्रण तयार करा.
तवा गरम झाल्यानंतर त्यात बटर टाका आणि वरून पॅनकेकचे मिश्रण टाकून दोन्ही बाजूने भाजून घ्या.
तयार आहेत सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले केळी पॅनकेक. पॅनकेक सर्व्ह करताना वरून त्यावर मध टाकावे.

हेही वाचा :

मराठी पाट्या न लावणाऱ्या दुकानांना दोन कोटींचा भुर्दंड, काहींची मुजोरी सुरूच…
प्रसिद्ध अभिनेत्याचा कारमध्ये भयानक अवस्थेत आढळला मृतदेह, मृत्यूचं कारण…
प्रत्येक मेट्रो स्थानकाखाली राखीव प्रवासी थांबा तयार करा‌, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे निर्देश