भाजपच्या माजी खासदार प्रज्ञासिंह ठाकूर आणि लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांच्यासह सात(facecloth) आरोपींवर भारतीय दंड संहिता (आयपीसी) आणि दहशतवाद विरोधी कायद्यानुसार (यूएपीए) खून, गुन्हेगारी कट रचणे असे गंभीर आरोप आहेत.

मालेगाव बॉम्बस्फोटाचा निकाल आज येणार; तब्बल 17 वर्षांनंतर न्याय मिळण्याची आशा
मालेगाव बॉम्बस्फोटाचा निकाल आज येणार; तब्बल 17 वर्षांनंतर न्याय मिळण्याची आशा
मुंबई : देशात आत्तापर्यंत अनेक दहशतवादी हल्ले झाले आहेत.(facecloth) त्यात सर्वाधिक चर्चेत असलेल्या दहशतवादी घटनांपैकी एक असलेल्या २००८ च्या मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याचा निकाल आता येण्याची शक्यता आहे. तब्बल १७ वर्षांनंतर हा निकाल येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. गुरुवारी न्या. ए.के. लाहोटी विशेष न्यायालयात आपला निकाल सुनावू शकतात, अशी माहिती समोर आली आहे.
या प्रकरणात, भाजपच्या माजी खासदार प्रज्ञासिंह(facecloth) ठाकूर आणि लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांच्यासह सात आरोपींवर भारतीय दंड संहिता (आयपीसी) आणि दहशतवाद विरोधी कायद्यानुसार (यूएपीए) खून, गुन्हेगारी कट रचणे असे गंभीर आरोप आहेत. २९ सप्टेंबर २००८ रोजी, रमजानच्या काळात, महाराष्ट्रातील मालेगावमधील भिकू चौकातील मशिदीजवळ मोटारसायकलमध्ये ठेवलेल्या बॉम्बस्फोटामुळे दहशत निर्माण झाली होती. या स्फोटात ६ जण ठार झाले आणि १०० हून अधिक जण जखमी झाले. स्फोट इतका शक्तिशाली होता की, जवळच्या दुकाने आणि घरांचे नुकसान झाले होते.
हेही वाचा :
मोदींना भाजपची गरज नाही! खासदार निशिकांत दुबेंचं स्फोटक विधान
सांडपाणी गटारी साठी स्वामी मळा परिसरात नागरिक बसणार उपोषणाला* .