मायक्रोसॉफ्ट वापरकर्ते सतर्क राहा! सरकारने दिलाय ‘या’ असुरक्षेचा इशारा

भारतीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालया अंतर्गत येणारे(government) भारतीय संगणक आपात प्रतिसाद संघ (CERT) ने मायक्रोसॉफ्ट उत्पादनांमध्ये आढळलेल्या अनेक भेद्यतेबद्दल,असुरक्षिततेबद्दल महत्वपुर्ण सुरक्षा सल्ला जारी केला आहे. यामुळे वापरकर्त्यांची वैयक्तिक माहिती धोक्यात येऊ शकते.

मायक्रोसॉफ्ट विंडोज, मायक्रोसॉफ्ट ऑफिस, मायक्रोसॉफ्ट डायनामिक्स, बिंग ब्राउजर,(government) मायक्रोसॉफ्ट डेव्हलपर टूल्स, मायक्रोसॉफ्ट अझ्युर आणि इतर अनेक मायक्रोसॉफ्ट अनुप्रयोगांमध्ये या भेद्यता आढळल्या आहेत. यामुळे तुमची संवेदनशील माहिती उघड होण्याचा धोका वाढतो. तुमच्या संगणनावर अनधिकृत नियंत्रण येऊ शकते तसेच तुमची माहिती चोरली जाऊ शकते.

CERT-In ने आपल्या सल्ल्यामध्ये नमूद केले आहे की, “या भेद्यतेमुळे हल्लेखोर तुमची संवेदनशील माहिती मिळवू शकतात, तुमच्या संगणनावर नियंत्रण मिळवू शकतात आणि तुमची माहिती चुकीची दाखवून तुम्हाला फसवू शकतात.”

CERT-In ने या भेद्यतेमुळे आर्थिक नुकसान, माहिती चोरी आणि संवेदनशील माहितीचा अनधिकृत प्रवेश होण्याची शक्यता असल्याचे सांगितले आहे.

या धोक्यांपासून वाचण्यासाठी तुमच्या सिस्टीम, अँप्लिकेशन आणि सुरक्षा सॉफ्टवेअरसाठी नियमित सॉफ्टवेअर अपडेट करणे आवश्यक आहे. या अपडेटमध्ये या भेद्यता दूर करणारे patch असतात.

तसेच, संवेदनशील माहिती असलेल्या खात्यांसाठी मजबूत पासवर्ड वापरणे आणि वाईरसचा धोका कमी करण्यासाठी एंटीव्हायरस सॉफ्टवेअर डाऊनलोड करणे आवश्यक आहे. fraud लिंक्स आणि फिशिंग ईमेल बद्दल खबरदारी बाळगणेही आवश्यक आहे.

हेही वाचा :

गौतम गंभीरला टीम इंडियाचा कोच होण्याचा आग्रह

कोल्हापूर जिल्हा प्रशासन ऍक्शन मोडवर, अनधिकृत होर्डिंगवर कारवाईला सुरवात

खरं कोण बोलतंय? फडणवीस की ठाकरे?