मिसळ पे चर्चा’ अन् काँग्रेसच्या नगरसेवकांवर गुन्हा दाखल; काल्हापुरात काय घडलं?

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी आणि महायुतीच्या उमेदवाराकडून(kolhapur) प्रचाराच्या अनेक फंडे वापरले जात आहेत. मतदारांना आकर्षित करण्यासाठी अनेक उपक्रमाच्या माध्यमातून गर्दी जमून आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न केला जातो.

अशातच कोल्हापुरात(kolhapur) प्रसिद्ध असणाऱ्या मिसळ पे चर्चा आयोजित करून मतदारांशी संवाद साधण्याचा प्रयत्न उमेदवार आणि नेत्यांकडून केला जात आहे. गल्लीबोळात होणारी मिसळ पे चर्चा आता ठीक ठिकाणी वादाचे विषय बनत आहेत.

कोल्हापुरातील कसबा बावडा येथे आयोजित करण्यात आलेल्या मिसळपे चर्चा कार्यक्रमात वादावादी झाल्याने काँग्रेसच्या माजी नगरसेवकांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी शिवसेना पक्षाच्या वतीने न्यू पॅलेस परिसरात मिसळपे चर्चांचे आयोजन करण्यात आलं होतं.

यावेळी काँग्रेसचे माजी नगरसेवक राजाराम गायकवाड यांनी शिवसेनेचे कार्यकर्ते असलेल्या ऋषिकेश सुरेश भद्रा यांना फोनवरून दमदाटी केल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

दरम्यान भद्रा यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात काँग्रेसचे नगरसेवक राजाराम गायकवाड यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या तक्रारीत गायकवाड यांनी मला आक्षेपार्य आणि अश्लील भाषेचा वापर करून दमदाटी केली असल्याची तक्रार भद्रा यांनी दिली आहे.

हेही वाचा :

कोण गरजले, कोण बरसले कोणाचे नेमके कुठे बिनसले?

कोल्हापूर-हातकणंगलेत प्रतिष्ठा पणाला, शिंदे मतदारसंघात तळ ठोकून

संजय पाटील विरुद्ध विशाल पाटील यांच्यात ‘टशन’; माजी मंत्र्यांच्या भूमिकेमुळे निवडणूक बनली लक्षवेधी