मनसे महायुतीचा प्रचार करणार, राज ठाकरेंनी केली घोषणा?

मुंबई: ‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळेच अयोध्येत राम मंदिर(grand) उभे राहू शकले. त्यांच्या काळात ‘सीएए’ कायदा, कलम ३७० मागे हटविण्यात आले. त्यांनी गेल्या पाच वर्षांत अनेक खंबीर निर्णय घेतले असल्याने त्यांना पुन्हा संधी मिळावी यासाठी महायुतीला पूर्ण सहकार्य करून प्रचार करणार आहे,’’ असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

प्रचारासाठी मनसेच्या(grand) नेत्यांची यादी येत्या दोन दिवसांत तयार करण्यात येणार असल्याचे ठाकरे म्हणाले. तसेच मनसेच्या नेत्यांना सन्मानाची वागणूक मिळेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. सततच्या बदलत्या भूमिकेवरून प्रतिक्रिया उमटू लागल्यावर मनसेने आज पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. ठाकरे यांनी महायुतीला संपूर्ण सहकार्य करण्याच्या सूचना त्यांनी कार्यकर्त्यांना दिल्या.

राज ठाकरे म्हणाले की, आम्ही भूमिका बदलतो असे म्हणता, पण आमच्या भूमिका या मुद्द्यांवर आहेत. भूमिका बदलणे आवश्यक होते. मी २०१९ मध्ये धोरणांवर टीका केली. मला मुख्यमंत्रिपद नाही दिले किंवा कुणी पक्ष फोडून ४० आमदार फोडले म्हणून टीका केली नाही, असा चिमटाही त्यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता काढला.

महाराष्ट्राबाबतच्या मागण्या मोदींपर्यंत पोहोचतील. राज्याबाबत आमच्या काही मागण्या आहेत. मराठीला अभिजात दर्जा मिळावा, गड-किल्ल्यांचे संवर्धन झाले पाहिजे. महाराष्ट्र औद्योगिकदृष्ट्या पुढारलेला आहे. मोदींनी आपल्या अपत्याप्रमाणे सर्व राज्यांना समान वागवावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

मोदी खंबीरपणे निर्णय घेत असल्याने त्यांना पाठिंबा दिला. ज्यांना हे निर्णय समजत नाही ते त्यांचा निर्णय घ्यायला मोकळे आहे. पक्षाने आपल्या नेत्यांना, कार्यकर्त्यांना समजवावे.

हेही वाचा :

अ‍ॅपलच्या ग्राहकांना कंपनीने दिलं मोठं गिफ्ट! आता स्वस्तात दुरूस्त होणार आयफोन

शरद पवार देणार एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला धक्का, बड्या नेत्याचा राष्ट्रवादीत प्रवेश

हातकणंगलेसाठी मुख्यमंत्र्यांची रात्रभर खलबतं, सोमवारी गांधी मैदानात देणार बूस्टर डोस