मोदींना भाजपची गरज नाही! खासदार निशिकांत दुबेंचं स्फोटक विधान

भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी दिलेल्या एका मुलाखतीत केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं. भाजपला आता नरेंद्र मोदींची गरज नाही, उलट मोदींना आज भारतीय जनता पक्षाची(political updtaes) गरज आहे,” असं वक्तव्य करत त्यांनी सध्याच्या राजकीय समीकरणांवर प्रकाश टाकला.

मुलाखतीत दुबे म्हणाले की, जनतेचा आणि भाजप कार्यकर्त्यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर प्रचंड विश्वास आहे. ‘अबकी बार 400 पार’ हे स्वप्न साकार होऊ शकलं असतं. जनता आमच्या सोबत होती. मात्र, काही ठिकाणी कार्यकर्त्यांनी अपेक्षित कामगिरी केली नाही. त्यामुळेच आम्ही 241 जागांवर थांबलो.

दुबे यांनी सांगितलं की, त्या काळात हरियाणातील निवडणूक(political updtaes) आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची होती. त्यासाठी संघटनेत सातत्य आवश्यक होतं. नंतर पाकिस्तानच्या संदर्भात एक वेगळंच वातावरण निर्माण झालं होतं. दिल्लीमध्येही भाजपला 27 वर्षांनंतर सत्ता मिळाली. अरविंद केजरीवाल यांना हरवणं अत्यंत कठीण होतं, पण ते आम्ही शक्य केलं. दुबे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दलही स्पष्ट भूमिका मांडली. “RSS नाराज नाही. त्यांनी जो काही अजेंडा ठरवला होता, तो मोदींनी पूर्ण केला. 370 कलम हटवलं, राम मंदिर उभारलं. मग ते नाराज कसे असतील?

मोहन भागवत यांच्या ‘75 वर्षांनंतर निवृत्ती घ्यावी’ या विधानावर भाष्य करत दुबे म्हणाले की, 2009 पासून मोहन भागवत यांनी पक्षाच्या विस्तारात मोलाचं योगदान दिलं आहे. त्याच वेळी त्यांनी नितीन गडकरी यांना पक्षाध्यक्ष केलं, जे दिल्लीत कधी राहिले नव्हते. संघाने जे झाड लावलं, त्याला फळं यायला लागली आहेत. मोदींच्या पंतप्रधानपदासाठी उमेदवारीच्या काळात झालेला अंतर्गत विरोधही दुबे यांनी स्पष्ट केला. मोदींची निवड सोपी नव्हती. पण संघानं, विशेषतः मोहन भागवत यांनी त्या वेळी धाडस दाखवत मोदींना पंतप्रधानपदाचा उमेदवार बनवलं. हे मोठं राजकीय पाऊल होतं.

दुबे यांच्या या विधानांमुळे भाजप आणि आरएसएसमधील सध्याच्या नात्यांवर चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. काही राजकीय विश्लेषकांच्या मते, दुबे यांनी मांडलेला मुद्दा म्हणजे संघटनेतील अंतर्गत असंतोषावर पडदा घालण्याचा प्रयत्न असू शकतो, तर काहींच्या मते हा मोदींच्या नेतृत्वावर विश्वास दर्शवण्याचा प्रयत्न आहे.

हेही वाचा :

रक्षाबंधनाआधीच बहिणीचा अक्राळविक्राळ चेहरा, भावाचा गळा दाबून…

महाराष्ट्र मंत्रिमंडळात ‘वाईल्ड कार्ड’ एन्ट्रीची शक्यता! शिंदेंकडून ‘मास्टरस्ट्रोक’, अजित पवार गटाला धक्का?

जैन समाजाचे एकत्रित आवाहन – JIO चा बहिष्कार करून माधुरीसाठी न्याय मागा