मोदींनी तुमच्या-आमच्या सारख्यांच्या खिशातून पैसा घेतला अन् अदानी, अंबानीला…

गेली साठ वर्ष हा देश डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी(my pocket) दिलेल्या घटनेवर चालतो. पण दहा वर्ष सत्तेत असलेल्या भाजप आणि या पक्षाच्या सरकारचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देश घटनेच्या चौकडी मोडून चालवत आहेत. बाबासाहेब आंबेडकरांनी श्रीमंताकडून पैसा घेऊ गरिबांसाठी योजना राबवा, त्यांचे जीवनमान उंचावेल असे काम करा, असे सांगितले होते. पण मोदी सरकार त्याउलट वागत आहेत.

जीएसटीसारख्या करातून त्यांनी गोरगरीब, सर्वसामान्यांच्या खिशाला(my pocket) कात्री लावली. तुमच्या-माझ्यासारख्याच्या खिशातून पैसा काढला आणि अदानी, अंबानींना मोठं केलं, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली. महाविकास आघाडीचे उमेदवार डाॅ. कल्याण काळे यांच्या प्रचारासाठी जाफ्राबाद येथे आयोजित सभेत पटोले बोलत होते.

एखाद्या भागाला पंचवीस वर्ष एकाच पक्षाचा खासदार, दोन वेळा मंत्रिपद मिळतं तरी जर लोकांना महिनाभर प्यायला पाणी मिळतं नसले तर मग कसल्या विकासाच्या गप्पा मारता, असा टोलाही पटोले यांनी विरोधकांना लगावला.सत्तेचा गैरवापर करून पक्ष फोडायचे, आमच्या कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल करायचे हे प्रकार खपवून घेतले जाणार नाही. माझी पोलिसांनाही विनंती आहे,

काळे यांना हार घालणाऱ्या एका आमच्या कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. अशा चुकीच्या पद्धतीने तुम्ही वागू नका, उद्या मोदी सरकार केंद्रातून जाणार आहे, देशात इंडिया आघाडीचे सरकार येणार आहे. मग गाठ आमच्याशी आहे, असा इशारा पटोले यांनी पोलिसांना दिला. राजकारणात मी तीस वर्षापासून सामाजिक काम करतोय, पण आम्ही कधी पैशासाठी काम केलं नाही.

आमची बांधिलकी जनतेशी आहे, त्यांच्यासाठी आम्ही काम करतोय. पण ही व्यवस्था मोडीत काढण्याचं काम मोदी सरकार करतंय. त्यामुळे ही आलेली संधी सोडू नका, आता चुकलात तर मग विधानसभा, महापालिका, जिल्हा परिषद, नगर पालिका, ग्रामंपचायत सगळं गेलं म्हणून समजा. मोदी सांगतात हा तर ट्रेलर आहे, पिक्चर अजून बाकी आहे. म्हणजे ट्रेलमध्ये यांनी देश विकायला काढला, लोकांना कर्जाच्या ओझ्याखाली टाकलं.

गरीबाच्या तोंडचा घास पळवून उद्योगपती मित्रांचे खिसे भरण्याचे पाप हे मोदी सरकार (Modi Government) करत आहे. देशात या सरकार विरोधात संताप आहे. मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, खान्देश, कोकण जिथे जिथे आम्ही फिरतोय तिथे चित्र स्पष्ट दिसतंय. येत्या चार जून रोजी जेव्हा मतमोजणी होईल, तेव्हा मराठवाड्यातील सर्व जागा तर आपण जिंकणार आहोतच, पण महाराष्ट्रात आणि देशात इंडिया आघाडीचे सरकार आल्याशिवाय राहणार नाही, असा दावा नाना पटोले यांनी केला.

हेही वाचा :

16 शाळांना बॉम्बनं उडवून देण्याची धमकी! पोलिसांचं धाबं दणाणलं

‘तुला अधिकार नाहीत…’ करिना कपूर सावत्र मुलाबद्दल असं का म्हणाली?

इन्स्टाग्रामवर केली एक चूक अन् काही क्षणातच गमवावा लागला जीव!