माता न तू वैरिणी! चिमुकलीला अत्यंत क्रूरपणे मारहाण Video

गेल्या काही दिवसांपासून देशातील प्रत्येक शहरांमध्ये गुन्हेगारीच्या(mother) घटनांमध्ये मोठी वाढ झालेली पाहायला मिळते. अनेक ठिकाणी मारहाण ,हत्या तर कधी अपहरण अशा असंख्य घटना सातत्याने समोर येत राहतात. अशातच आता एक हादरवणारी घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत एक आईच आपल्या पोटच्या मुलीला मारहाण करताना दिसत आहे. काळीज पिळवटून टाकणारा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

ज्या पोटच्या मुलीला(mother) जन्म दिला,त्याच मुलीला क्रुरपणे मारण्याचा विचारही कोणी करु शकत नाही. मात्र या आईने हे सगळं केलं. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होताच सर्वत्र मोठी खळबळ उडाली आहे. मात्र या आईने केलेली मारहाणीचे कारण नक्की समजू शकलेले नाही.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता, एक महिला तिच्याच चिमुकल्या मुलीला उलातण्याने मारताना दिसत आहे. चिमुकली आईला थांबवण्याचा प्रयत्न करते मात्र निर्दयी आई काही तिला जोरजोरात मारताना दिसते.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया एक्सवर व्हायरल होत आहे. व्हिडिओ गुजरातमधील असल्याचे समजत असून ज्या वेळेस आई त्या चिमुकलीला मारत आहे त्या घटनेचा व्हिडिओ तिच्या वडिलांनी मोबाईमध्ये कैद केला. तथापि, साम टीव्ही डिजीटल या व्हिडिओच्या सत्यचेची खात्री देत नाही.

https://twitter.com/snehakolte1/status/1789544438286438710

व्हिडिओ व्हायरल झालेल्यानंतर व्हिडिओ पाहून प्रत्येक नेटकऱ्यांचा संताप झाला आहे. ‘एवढ्याशा लहान चिमुकलीला मारताना त्या आईला जराही काही जाणवले नसेल’,असा प्रश्न प्रत्येकालाच पडलेला आहे. व्हिडिओ पाहिलेल्या प्रत्येकाने त्या महिलेविरुद्ध तीव्र संपात व्यक्त केला असून तिच्या विरोध्दात कारवाई करावी असे म्हटले आहे. व्हिडिओ बनवणाऱ्या वडिलांनी ही मारहाण थांबवण्याचा प्रयत्नही केला नाही असेही प्रश्न नेटकऱ्यांनी कमेंट बॉक्समध्ये विचारले आहेत.

हेही वाचा :

मोदी सरकार चले जाव! 17 मे रोजी महाविकास आघाडीची अतिभव्य सभा

नरेंद्र मोदी पुन्हा निवडून आल्यास देशातील लोकशाही संपणार; उद्धव ठाकरेंचा घणाघात

‘मुख्यमंत्र्यांची अखेरची फडफड, शिंदे, अजित पवारांना एकही जागा मिळणार नाही’, संजय राऊतांचा टोला