मुंबईकरांनो सावधान! शहरात ‘या’ ३ रोगांचा कहर, रुग्णसंख्या वाढल्याने बीएमसी अलर्टवर

मुंबई शहरात पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर साथीच्या आजारांनी डोकं वर काढलं आहे. विशेषतः मलेरिया, डेंग्यू आणि चिकनगुनिया यांसारख्या आजारांच्या रुग्णांमध्ये (Patient population)झपाट्याने वाढ होत असून BMC प्रशासनाने अलर्ट मोडमध्ये कारवाई सुरू केली आहे. नागरिकांनी आरोग्याची विशेष काळजी घ्यावी, असा इशारा पालिकेकडून देण्यात आला आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य अहवालानुसार, यावर्षी मलेरियाचे रुग्ण ४,१५१ पर्यंत पोहोचले आहेत, जे मागील वर्षी याच कालावधीत २,८५२ होते. डेंग्यूचे रुग्णदेखील ९६६ वरून १,१६० पर्यंत वाढले असून, फक्त जुलैच्या दुसऱ्या पंधरवड्यातच ४२६ नवीन रुग्ण (Patient population)आढळले आहेत.

चिकनगुनियाचे प्रमाण देखील चिंताजनक पातळीवर पोहोचले आहे. गेल्या वर्षी फक्त ४६ रुग्ण (Patient population) होते, मात्र यावर्षी २६५ रुग्णांची नोंद झाली आहे. यातील ८६ रुग्ण फक्त मागील पंधरवड्यात आढळले आहेत. पावसामुळे शहरात ठिकठिकाणी पाणी साचल्याने मच्छरवाढीस अनुकूल वातावरण तयार झाले आहे, हेच या साथीमागील मुख्य कारण मानले जात आहे.

याशिवाय, हॅपेटायटीस ए आणि ई या आजारांचं प्रमाण देखील वाढले आहे. जानेवारी ते जुलै २०२५ या कालावधीत हॅपेटायटीसचे ६१३ रुग्ण आढळले आहेत. लेप्टोस्पायरोसिस आणि गॅस्ट्रोएन्टेरिटिसचे प्रमाण काहीसे कमी झाले असले, तरी नागरिकांनी काळजी घेणे अत्यावश्यक आहे.

मुंबई महानगरपालिकेने नागरिकांसाठी आरोग्यविषयक मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. यामध्ये घरात आणि आजूबाजूला साचलेलं पाणी हटवणं, मच्छरदाणीचा वापर, उकळलेलं पाणी पिणं, रस्त्यावरील अन्नपदार्थ टाळणं आणि ताप आल्यास तात्काळ वैद्यकीय सल्ला घेणं अशा बाबींचा समावेश आहे.

याशिवाय BMC ने ‘आपली चिकित्सा योजना’ पुन्हा सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत सामान्य रक्त तपासणी, लघवी तपासणी, ताप व संसर्गजन्य आजारांवरील चाचण्या कमी किमतीत उपलब्ध आहेत. तपासणीचे निकाल व्हॉट्सॲपवरही उपलब्ध होतील, अशी माहिती प्रशासनाने दिली आहे.

हेही वाचा :

आनंदवार्ता, सलग पाचव्यांदा गॅस सिलेंडर स्वस्त; तुमच्या शहरातील भाव जाणून घ्या
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! रक्षाबंधनापूर्वी महागाई भत्ता ‘इतक्या’ टक्क्यांनी वाढणार?
दररोज दही खाणे आरोग्यावर परिणाम करू शकतात का? ‘ही’ 5 तथ्ये तुमचा संभ्रम करतील दूर