भाजपमध्ये गेलेल्या माझ्या मुलाचा पराभव व्हावा, काँग्रेस नेते ए. के अँटोनी यांचे महत्त्वपूर्ण विधान

: राजकारणात कधी भाऊ भावाच्या विरोधात जातो तर कधी काका पुतण्याच्या. तर कधी(leadership development) कधी एकाच घरात वेगवेगळ्या विचारधारेचे लोक असतात. त्यामुळेच राजकारणात कधी काय होईल हे सांगता येत नाही असं म्हणतात. सध्या असंच एक उदाहरण समोर आलं आहे. ज्यामध्ये आपल्या मुलाचा निवडणुकीत पराभव व्हावा अशी इच्छा चक्क एका वडिलांनी व्यक्त केली आहे.

लोकसभा निवडणुकीत जिंकून येण्यासाठी उमेदवार मतदारसंघ पिंजून काढत आहेत. यासाठी कार्यकर्त्यांसह संपूर्ण कुटुंब आणि मित्रपरिवाला ते कामाला लावत आहेत. मात्र, ए.के. अँटनी यांनी आपल्या मुलाच्या पराभवाची इच्छा व्यक्त केली आहे.

लोकसभा निवडणुकीत अनेक कुटुंबांमध्ये राजकीय लढाई होत असल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच देशाचे माजी संरक्षण मंत्री आणि काँग्रेस नेते ए. के. अँटनी यांनी आपला मुलगा अनिल अँटनी याला निवडणुकीत पराभूत होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. अँटनी यांनी आपल्या मुलाच्या भूमिकेवर जोरदार टीका केली आहे. शिवाय माझ्या मुलगा निवडणुकीत पराभूत होणे गरजेचे असल्याचंही अँटनी यांनी म्हटलं आहे.

ए. के. अँटनी यांचा मुलगा अनिल अँटनी हे केरळच्या पठाणमथिट्टा(leadership development) लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. मुलाचा भाजपमध्ये जाण्याचा निर्णय वडील ए. के. अँटनी यांना चांगलाच खटकला आहे. त्यामुळे त्यांनी माझ्या मुलाचा पराभव व्हावा असं वक्तव्य त्यांनी केलं आहे. इतकंच नव्हे तर अँटनी यांनी मुलगा अनिल याच्याविरोधात प्रचार करायला सुरुवात केली आहे.

लोकसभा निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. या निवडणुकीत जिंकून येण्यासाठी उमेदवार मतदारसंघ पिंजून काढत आहेत. यासाठी कार्यकर्त्यांसह संपूर्ण कुटुंब आणि मित्रपरिवाला ते कामाला लावत आहेत. मात्र, ए.के. अँटनी यांनी मात्र आपल्या मुलाच्या विजयाची नव्हे तर पराभवाची इच्छा व्यक्त केली आहे. अनिल अँटनी हे भाजपमध्ये गेले असून ते केरळमधून निवडणूक लढवत आहेत. पंरतू अनिल यांचा पराभव झाला पाहिजे असं ए.के. अँटनी यांनी म्हटलं आहे. शिवाय इंडिया आघाडी पुढे जात असून भाजप खाली जात आहे, त्यामुळे आम्हाला सरकार स्थापन करण्याची संधी आहे असंही ते म्हणाले आहेत.

इंडिया आघाडी आणि आमची पार्टी पंतप्रधान नरेंद्र मोदी,(leadership development) भाजप आणि आरएसएसच्या विचारसरणीविरोधात लढत आहे. अशातच माझ्या मुलाने भाजपमध्ये जाऊन चूक केली. त्यामुळे त्याचा पराभव झाला पाहिजे असं अँटनी यांनी म्हटलं आहे. अनिल अँटनी दक्षिण केरळ लोकसभा मतदारसंघातून भाजपाच्या तिकीटावर निवडणूक लढत आहे.

त्यांच्याविरोधात काँग्रेसने एंटो अँटनी यांना उमेदवारी दिली आहे. पत्रकार परिषदेत बोलताना ए. के अँटनी म्हणाले, “माझ्या मुलाचा पराभव झाला पाहिजे आणि त्याच्या विरोधात निवडणूक लढवणारे काँग्रेसचे उमेदवार अँटो अँटनी विजयी झाले पाहिजेत”. तसेच यावेळी त्यांनी काँग्रेस नेत्यांच्या मुलांनी भाजपमध्ये प्रवेश करणं चुकीचं असल्याचंही ते म्हणाले.

हेही वाचा :

अजितदादा म्हणाले तोंड उघडायला लावू नका

संजू सॅमसनच्या नेतृत्वात राजस्थान सलग पाचव्या विजयासाठी सज्ज

रानडुकराच्या हल्ल्यात युवक गंभीर जखमी