सतेज पाटलांना खासदारकी स्वतःच्या घरात वापरायची आहे संजय मंडलिकांचा हल्लाबोल

सतेज पाटलांचा खासदारकी आपल्या घरात वापरायची असल्याचा हल्लाबोल खासदार(attack) संजय मंडलिक यांनी केला आहे. कोल्हापूरात ते प्रचार कार्यलयाच्या उद्घाटनावेळी ते बोलत होते.

काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी शाहू महाराज खासदार झाले की प्रत्येक तालुक्यात त्यांचं कार्यालय उघडणार असल्याची घोषणा केली आहे होती. तसेच विद्यमान खासदारांकडे गेलेल्या पत्रावर तीन-तीन दिवस सह्या होत नाहीत अशी टीकाही पाटील यांनी संजय मंडलिक यांच्यावर केली होती. दरम्यान त्यांच्या या वक्तव्याचा समाचार घेत महायुतीचे उमेदवार खासदार संजय मंडलिक यांनी आमदार सतेज पाटलांना प्रत्येक तालुक्यात अजिंक्यतारा कार्यालयाच्या शाखा काढायच्या आहेत का? असा सवाल करत शाहू महाराजांना निवडून आणून आमदार सतेज पाटील यांना खासदारकी स्वतःच्या घरात वापरायची आहे अशा शब्दात हल्ला चढवला आहे. ते आज कोल्हापूरात प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते.

आमदार सतेज पाटील तुम्हाला आताच मी चुकीचा कसा वाटायला लागलो, (attack)२०२६ पर्यंत माझ्या नेतृत्वाखाली हा जिल्हा विकास करेल असं म्हटला होता, तुम्हालाच निवडणुकीला उभं राहायला लागणार म्हटल्यानंतर तुम्ही राजकीय बळी शोधला आणि शाहू महाराज यांना गळ घातली, कुस्तीच्या आखाड्यात ज्या पद्धतीने डाव टाकला जातो, टांग मारली पाहिजे, अंगावर माती टाकली पाहिजे त्यापद्धतीने सगळं होणार त्यामुळे पालकमंत्री मुश्रीफ यांनी शाहु महाराजांना विनंती केली होती की राजकारणात पडू नका, पण त्यांची पण महत्वकांक्षा होती की माहीत नाही असंही खासदार मंडलिक यावेळी म्हणाले.

कोल्हापूरच्या गादीवर ज्या पद्धतीने ते आले तसा राजहट्ट या लोकसभेच्या निवडणुकीत देखील आहे, मात्र सगळे राजहट्ट पुरवायला कोल्हापूरची जनता राहिली नाही, आमदार सतेज पाटील काल म्हणाले की प्रत्येक तालुक्यात एक संपर्क कार्यालय काढणार आहे, मला वाटतं त्यांना अजिंक्यतारा या कार्यालयाच्या शाखा काढायच्या आहेत, आमदार पाटील यांना ही खासदारकी आपल्या घरात वापरायची आहे, खासदार-आमदार(attack) गोकुळ चेअरमन आपल्या घरातील नोकर आहेत अशा पद्धतीने ही मंडळी वागत आहेत, मी कालपर्यंत पुरोगामी होतो आज अचानक त्यांना प्रतिगामी दिसू लागलो, कोल्हापुरात जन्माला आलेला प्रत्येक माणूस हा शाहू विचारांचा आहे, इथल्या पाण्यामध्ये, इथल्या मातीमध्ये, इथल्या डीएनएमध्ये शाहू विचार आहेत, राजर्षी शाहू महाराजांनी सगळ्यात महत्त्वाचं काम केलं ते म्हणजे प्रत्येक घरात पुरोगामी विचार दिला, आता निवडणुकीला उभा राहिलेल्या वारसदाराने देखील सांगितलं पाहिजे त्यांनी काय काम केलं अशा शब्दात मंडलिकांनी हल्ला चढवला.

हेही वाचा :

अजितदादा म्हणाले तोंड उघडायला लावू नका

मालिकेतील आव्हान कायम राखण्यासाठी लढणार;

संजू सॅमसनच्या नेतृत्वात राजस्थान सलग पाचव्या विजयासाठी सज्ज