मला साधेच कपडे आवडतात. पांढरा टीशर्ट मी आवडीने घाललो त्याची कारणे दोन आहेत. हा पांढरा रंग (color)तुमच्यातील पारदर्शकता आणि साधेपणा, सच्चेपणा दाखवतो, असे सांगत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ते नेहमी पांढरा टी-शर्टच का घालतात? याचे उत्तर दिले आहे.
याशिवाय आणखी काही हलक्या-फुलक्या प्रश्नांची उत्तरे त्यांनी काँग्रेसने सोशल मीडिया चॅनेलवर प्रसृत केलेल्या एका व्हीडीओमध्ये दिली आहेत. यात त्यांच्यासमवेत काँग्रेस अध्यक्ष खरगे हेही आहेत. माझ्या मते, विचारसरणीची स्पष्ट समज असल्याशिवाय तुम्ही एक मोठी संघटना म्हणून सत्तेच्या दिशेने जाऊ शकत नाही. आमची विचारसरणी गरीब समर्थक, महिला समर्थक आणि प्रत्येकाला समान वागणूक देणारी आहे हे आम्हाला लोकांना पटवून द्यायचे आहे, असे त्यांनी या व्हीडीओत म्हटले आहे.(color)
व्हिडीओमध्ये काँग्रेसचे प्रमुख मल्लिकार्जुन खरगे यांना त्यांनी, प्रचारात तुम्हाला काय आवडते किंवा आवडत नाही असे विचारले आहे. यावर खरगे म्हणाले की, यातील काहीही वाईट नाही. हे चांगलं आहे कारण आपण हे देशासाठी करत आहोत. जे देश बिघडवत आहेत, त्यांना रोखण्यासाठी आपण काम करतो तेव्हा आपल्याला बरं वाटतं. निदान आपण देशासाठी काहीतरी करत असतो.
प्रचाराचा सर्वोत्तम भाग
प्रचाराचा सर्वोत्कृष्ट भाग कुठला असे विचारल्यावर राहुल तत्काळ उद्गारले, प्रचार संपेल तेव्हा! प्रचारादरम्यान भाषणे करणे त्यांना आवडते कारण त्यामुळे ’देशाला कशाची गरज आहे याचा विचार करायला लागतो’, असे त्यांनी सांगितले.
हेही वाचा :
सई ताम्हणकर दिसणार आणखी एका बॉलिवूड चित्रपटात
शेवटच्या दिवशी कोल्हापुरात मुख्यमंत्र्यांचा रोड शो; भर उन्हात हजारो शिवसैनिक रस्त्यावर
मुख्यमंत्री कोल्हापुरात ठाण मांडून बसलेत, तरीही मी निवडणूक जिंकणार : राजू शेट्टी