सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोमवारी राज्याचे(political) मुख्यमंत्री अजित पवार यांची गुणवडी येथे जाहीर सभा झाली. आपल्या भाषणांमधून मिश्कील टीप्पण्या करणारे अजित पवार यांनी आपल्या भाषणामधून विरोधकांवर निशाणा साधतानाच ही आपली शेवटी निवडणूक नक्कीच नसल्याचंही सूचित केलं. भाषणामध्ये अजित पवारांनी केलेल्या एका विधानावरुन चांगलाच हशा पिकला.

मीच चेअरमन असणार त्यामुळे…
“आम्ही एफआरपी पेक्षा जास्त दर दिला तरी विरोधक सांगतात की कारखान्यावर कर्ज आहे. कारखान्यावर कर्ज नाही,” असं अजित पवारांनी भाषणात स्पष्ट केलं. “साखरेचा 239 कोटींचा साठा आहे. वसंतराव शुगर इंस्टीट्यूटने आपल्याला पुरस्कार दिला,” अशी आठवणही अजित पवारांनी(political) कारखान्याच्या कारभाराचा लेखाजोखा मांडताना करुन दिली.
तसेच अजित पवारांनी, “साखर भिजली सांगतात, असं काहीही झालं नाही. आता त्यांच्या पायाखालची वाळू सरकली म्हणून काहीही सांगतात,” असा टोला विरोधकांना लगावला. “मी डायरेक्ट होणार नाही असं म्हटलं होतं. चेअरमन होणार नाही असं म्हटलं नव्हतं. मी डायरेक्टर व्हायला उभा राहिलो नाही तर चेअरमन व्हायला उभा राहिलो आहे. मीच चेअरमन असणार त्यामुळे मी सगळं नियमाने करणार,” असं आश्वासन अजित पवारांनी दिलं.
माळेगाव येथील सहकारी साखर कारखान्यावर आपली बारीक नजर असल्याचं अजित पवारांनी भाषणामध्ये सांगितलं. “माळेगाव सहकारी साखर कारखान्याचा आता जाऊन फोटो काढा आणि मी चेअरमन झाल्यानंतर बघा कसा चेहरा मोहरा कारखान्याचा बदलतो. माझी नजर बारीक आहे. माझी बायको म्हणते कुठून याची इतकी बारीक नजर आहे काय माहित,” असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाषणात म्हटलं. माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या संचालकपदाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी घेतलेल्या जाहीर त्यांनी केलेल्या या विधानानंतर एकच हशा पिकल्याचं दिसून आलं.

माझ्या काळातील प्लनिंग…
“काही जण सांगतील माझी शेवटची निवडणूक आहे. अरे, किती निवडणूक ऐकतो आहे शेवटची निवडणूक… वय झालं की विस्मरण होत. माझं वय झालं की उद्या माझंही होईल. ते म्हणतात अजित पवार(political) सहकार मोडायला चालले आहेत. माझ्या काळातील प्लनिंग बघा, इमारती बघा. तुम्हाला जरी संधी मिळाली नाही तरी तुम्हाला आगामी काळात कामगार भरतीत संधी दिली जाईल. आपण ऑल इन वन आहोत,” असं अजित पवार म्हणाले.
तुमचं सगळ्यांचं भलं होण्यासाठी…
“मी उमेदवार आहे त्यामुळे मला काही मर्यादा आहेत. 24 तारीख झाली की आपण बोलूया! मी जर चेअरमन झालो तर माळेगावला काही अडचण येईल का? मला नियमाने चेअरमन होता येतं. मी पाच वर्षासाठी चेअरमन होणार आहे. तुमचं सगळ्यांचं भलं होण्यासाठी आम्हाला निवडून द्या,” असं आवाहन अजित पवारांनी केलं. “क्रॉस वोटिंग करू नका. मी सांगितले ते करून घेण्याची जबाबदारी तुमची करून देण्याची माझी,” असंही अजित पवार भाषणाच्या शेवटी म्हणाले.
हेही वाचा :
दिलासादायक! सोन्याच्या किंमतीत मोठी घसरण, चांदीचे दरही नरामले
जिओचा सर्वात स्वस्त रिचार्ज प्लान; ३३६ दिवसांसाठी अनलिमिटेड कॉलिंग अन् बरंच काही
घटस्फोटाच्या 4 वर्षांनंतर नागा चैतन्य-समांथा पुन्हा एकत्र! चाहत्यांसाठी गुडन्यूज