मागच्या काही काळात महाराष्ट्राच्या राजकारणाचा(political leaders) चिखल झालाय, हे अगदी वारंवार म्हटलं जातंय. या राजकीय परिस्थितीवर अगदी सर्वसामान्यांपासून ते दिग्गजांनी भाष्य केलं. त्याचप्रमाणे ही परिस्थिती सुधारण्याची गरज असल्याचंही अनेकजण म्हणतात. पण ही परिस्थिती सुधारण्यासाठीचे प्रयत्न मात्र कुणाकडूनच होत नाही, हेही तितकंच खरंय. आता या सगळ्यावर अभिनेते नाना पाटेकर यांनी भाष्य करत तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली.
ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी नुकतीच बोल भिडू या युट्युब चॅनलला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये नानांनी राजकीय नेत्यांना(political leaders) अगदी कठोर शब्दांत खडेबोल सुनावले असल्याचं पाहायला मिळालंय. तसेच नानांनी नागरिकांनाही आवाहन केलंय. ह्यांना कळत कसं नाही, मरणार आहात एक दिवस, जाणार आहात तुम्ही…, असं म्हणत नानांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
राजकीय नेत्यांवर भाष्य करताना नाना पाटेकरांनी म्हटलं की, आरश्यात बघताना स्वत:ची किळस आली की समजायचं जगण्यातली गंम्मत संपलीये. आमच्या बऱ्याचश्या राजकीय मंडळींनी वाटतं त्यांच्या घरातले आरसे फोडून टाकलेत. कधीतरी चुकून जेव्हा तहान लागल्यावर पाण्यामध्ये पाहतील तेव्हा लक्षात येईल आपलं माकड कधी झालं? तेव्हा ह्यांना कळत कसं नाही, मरणार आहात एक दिवस, जाणार आहात तुम्ही…
पुढे त्यांनी म्हटलं की, आता त्यांना पुन्हा नव्याने आरसे दाखवायला पाहिजेत. ते आपल्या हातामध्ये आहे.एकदा मत दिलं की आता पाच वर्ष आपल्याला काहीही करत येणार नाही,असं काही नाहीये.. जेव्हा जेव्हा जिथे जिथे विसंगती दिसली, वाईट दिसेल तेव्हा तेव्हा तिथे जा… जाळपोळ करा, गाड्या फोडा असं नाही.. तिथे जा, एकट्याने जा, दुकट्याने जा आणि प्रश्न विचारा… तुम्हाला घाबरणं जे त्यांचं थांबलंय ना.. ते पुन्हा घाबरायला हवं त्यांनी…ज्या दिवशी हे पुन्हा सुरु होईल ना त्यादिवशी राजकीय भोवताल बदलेल…
नाना पाटेकरांचा वनवास हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या सिनेमाच्या निमित्ताने सध्या ते सगळीकडे प्रोमोशनसाठी फिरत आहेत.दरम्यान, नाना पाटेकर यांच्या वनवास या चित्रपटाचे दिग्दर्शन अनिल शर्मा यांनी केलं आहे. उत्कर्ष शर्मा या चित्रपटात प्रमुख भूमिकेत आहेत. 20 डिसेंबर रोजी हा चित्रपट सिनेमागृहात पाहता येणार आहे.
हेही वाचा :
‘लाडक्या बहिणींच्या’ मानधनात पुढल्या भाऊबीजेला वाढ; मुनगंटीवारांच्या मोठं विधान
थेट 800 फुटांच्या नागफणी कड्यावरून अजित पवारांच्या मुख्यमंत्रिपदाची मागणी
पोलीस येताच वॉण्टेड आरोपीने 10 व्या मजल्यावरुन उडी मारली, धडकी भरवणारा VIDEO