जगात जास्त वापरलं जाणाऱ्या नेटफ्लिक्सने(Netflix) प्लॅनच्या किंमती वाढवल्या आहेत. नेटफ्लिक्सने अमेरिकेत सगळ्या सब्सक्रिप्शन प्लॅन्समध्ये वाढ केली आहे. ज्यामध्ये अॅड सपोर्टेड प्लॅनच्या किंमत पहिल्यांदा वाढवण्यात आल्या आहेत. सगळ्यात जास्त महाग अॅड फ्री प्लॅन केले आहे.
स्टॅन्डर्ड फ्री अॅडची किंमत 2.50 डॉलरवरुन 17.99 प्रतिमाह करण्यात आली आहे. तर अॅड सपोर्टेड प्लॅनमध्ये 1 डॉलरची किंमत वाढवण्यात आली आहे. त्यामुळे हा प्लॅन आता 7.99 डॉलर प्रतिमाह झाला आहे. त्यामुळे चाहत्यांच्या खिशाला कात्री लागणार आहे.
नेटफ्लिक्सने(Netflix) किंमती वाढवण्याचं मुख्य कारण ‘चांगला कंटेट’ सांगितलं आहे. कंपनीच्या माहिती पत्रात सांगितलं आहे की, ‘जास्त पैसे घेण्याचं कारण मुख्यत्वेकरून चांगला कंटेंट तसंच नेटफ्लिक्सला अजून चांगलं बनवणं हे आहे.’
नेटफ्लिक्सचे युजर्स वाढल्याने आता किंमती वाढवण्याचा निर्णय घेतल्याचही बोललं जात आहे. नेटफ्लिक्सचे 2024मध्ये 18.9 मिलियन नवे सब्सक्राइबर्स जोडले आहेत. त्यामुळे भविष्यात नेटफ्लिक्स 300 मिलियन पर्यंत जाण्याची शक्यता आहे. या किंमती वाढण्याचं मुख्य उद्देश चांगलं मनोरंजन करणे हा असल्याचंही नेटफ्लिक्सने म्हटलं आहे.
नेटफ्लिक्सने अमेरिकासह इतर देशातही किंमती वाढवण्यात आल्या आहेत. कॅनडा, पोर्तुगाल, आणि अर्जेंटिनामध्ये नेटफ्लिक्सने किंमती वाढवल्या आहेत. नेटफ्लिक्सने 2025साठी त्यांचा रेवेन्यू 43.5 बिलियनवरून 44.5 बिलियन वाढवला आहे. जो पहिल्या तुलनेत 500 मिलियन जास्त आहे.
हेही वाचा :
BCCI चा पाकिस्तानला पुन्हा एकदा दणका! रोहित शर्मासंदर्भात मोठा निर्णय
घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान चहलची आणखी एक पोस्ट, म्हणाला “खरं प्रेम…”
केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून पदभरती जाहीर, सरकारी नोकरीसाठी ‘असा’ करा अर्ज