शालेय शिक्षण विभागाचा नवा आदेश! 

राज्यात(state) तापमानाचा पारा तीव्र होत आहे. या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांना शाळेत उपस्थित राहण्यासंबंधी सवलत दिली आहे. शाळांचे काही महत्त्वाचे उपक्रम सुरू असल्यास तापमानाचा अंदाज घेऊन संबंधित शाळांनी निर्णय घ्यावा, असेही आदेशात नमूद आहे.
सोलापूर : राज्यातील (state)सोलापूर, पुण्यासह बहुतेक जिल्ह्यांमधील तापमानाचा पारा तीव्र होत आहे. या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांना शाळेत उपस्थित राहण्यासंबंधी सवलत दिली आहे. शाळांचे काही महत्त्वाचे उपक्रम सुरू असल्यास तापमानाचा अंदाज घेऊन संबंधित शाळांनी निर्णय घ्यावा, असेही आदेशात नमूद आहे.

सोलापूर जिल्ह्याचे तापमान यंदा ४३ अंश सेल्सिअसपर्यंत पोचले होते आणि मागील काही दिवसांपासून ते ४२ अंशावर स्थिर आहे. राज्यात उष्माघाताचे ८०पेक्षा अधिक रुग्ण विविध दवाखान्यांमध्ये उपचार घेत आहेत. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांसाठी शालेय शिक्षण विभागाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्यातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळांनी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून विद्यार्थ्यांना शाळेत उपस्थित राहण्याची सक्ती करू नये. शालेय शिक्षण विभागाच्या आदेशानुसार विद्यार्थ्यांसाठी ही सवलत सोमवारपासून (ता. २२) लागू होणार आहे. पण, राज्यातील इतर मंडळांच्या वेळापत्रकानुसार काही उपक्रम सुरू असल्यास त्यांच्याकडील विद्यार्थ्यांच्या उपस्थितीचा योग्य तो निर्णय शाळा व्यवस्थापनाने घ्यावा, असेही उपसचिव तुषार महाजन यांनी स्पष्ट केले आहे.

राज्यात काही दिवसांपासून तापमानात दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांना शाळेत उपस्थित राहण्यापासून सवलत दिली आहे. तर दुसरीकडे, शाळेत न येणाऱ्या विद्यार्थ्यांना (शालेय पोषण आहारास पात्र) कोरडा शिधा म्हणजेच तांदूळ व धान्यादी माल दिला जाणार आहे. तो कसा वाटायचा, यासंबंधी राज्य स्तरावरून स्वतंत्र बैठक घेऊन नियोजन निश्चित होईल.

  • कादर शेख, प्राथमिक शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद, सोलापूर

शिक्षकांना शाळेत चार तास उपस्थितीचे बंधन

२०२३-२४ या शैक्षणिक वर्षाच्या अंतिम सत्र परीक्षा आता बहुतेक शाळांच्या झाल्या आहेत. त्यामुळे अनेक शाळांमधील विशेषत: जिल्हा परिषद, माध्यमिक शाळांमधील विद्यार्थी शाळेत दररोज येतात अशी स्थिती नाही. पण, शिक्षकांना २ मेपासून उन्हाळी सुटी लागणार आहे. तोपर्यंत शिक्षकांनी सकाळी साडेसात ते साडेअकरा या वेळेत शाळेत उपस्थित राहणे बंधनकारक आहे. शाळेच्या वेळेत कोणी बाहेर जात असल्यास किंवा वेळेवर शाळेत येत नसल्याची तक्रार प्राप्त झाल्यावर संबंधितांवर कारवाई होऊ शकते, असा इशाराही शिक्षणाधिकाऱ्यांनी दिला आहे.

हेही वाचा :

अधिकार, हक्क, मनासारखा लोकप्रतिनिधी निवडून

प्रतिभा धानोरकर यांच्या नावासमोर ‘कॅन्सल’चा शिक्का

42 वर्षाच्या धोनीनं विराटसमोर ठेवला आदर्श