42 वर्षाच्या धोनीनं विराटसमोर ठेवला आदर्श

चेन्नई सुपर किंग्जचा(csk) थला महेंद्रसिंह धोनी यंदा आयपीएल हंगाम हा शेवटचा हंगाम असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. त्यामुळेच धोनीची टीम सीएसके कोणत्या मैदानावर जाते तेथे पिळवे वादळ धोनीचे शेवटचे दर्शन करण्यासाठी पोहचते.

जरी धोनीचा (csk)हा शेवटचा हंगाम आहे असं मानलं तरी त्यानं या हंगामाची वेगळ्याच लेवलवर तयारी केली आहे. कॅप्टन्सीची धुरा ऋतुराजच्या खांद्यावर दिल्यानंतर आता तो फलंदाजीत फक्त शेवटची 3-4 षटके खेळण्यासाठी येतो.

लखनौ सुपर जांयट्सविरूद्धच्या सामन्यात देखील तो 18 व्या षटकात फलंदाजीला आला. त्याने आपल्या स्टाईलनं सुरूवात केली. मात्र मोहसीन खानला त्यानं एक असा फटका मारला ज्यामुळं सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. कारण धोनी असं करताना यापूर्वी कधी दिसला नव्हता.

मात्र धोनीने बदलत्या टी 20 क्रिकेटमध्ये संयुक्तिक राहण्यासाठी आपल्या गेममध्ये देखील बदल केला. त्यानं डावखुऱ्या वेगवान गोलंदाजाला ऑफ साईट येत स्कूप शॉट खेळला. ही त्यांची इनिंगमधील पहिली सिक्स होती. या सिक्सची चर्चा बराच काळ राहणार आहे.
धोनीने वयाच्या 42 व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेऊन अनेक वर्ष झाली असताना कारकिर्दीच्या उतरंडीवर लागल्यानंतरही आपल्या गेममध्ये परिस्थितीनुसार बदल करण्याची वृत्ती दाखवली. हा विराट कोहलीसाठी देखील एक आदर्श ठरणार आहे.

कारण विराट कोहली देखील टी 20 क्रिकेट आपल्या ठरलेल्या स्टाईलने खेळतो. त्याला देखील आपल्या भात्यात अजून काही अतरंगी शॉट जमा होतील अन् त्याचा फायदा त्याला वेगाने धावा करण्यात मिळू शकतो.

हेही वाचा :

कोल्हापुरात उमेदवारांपेक्षा नेत्यांचीच कसोटी; कसं आहे निवडणुकीचं चित्र?

छगन भुजबळ यांची मोठी घोषणा, लोकसभा निवडणुकीतून माघार

मोदी तिसऱ्यांदा सत्तेत आले तर 300 युनिट वीज मोफत मिळणार, अजित पवार यांचं मोठं वक्तव्य