महाराष्ट्रात वाहनांवरील नवीन करप्रणाली लागू; जाणून घ्या कोणत्या कारला किती भरावा लागेल कर

महाराष्ट्रात वाहनांवरील करावर आजपासून मोठा बदल करण्यात आलाय.(silver price) सुधारित कर रचनेमुळे १ जुलैपासून महाराष्ट्रात उच्च दर्जाच्या कार, सीएनजी/एलएनजी वाहने आणि मालवाहू वाहनांच्या किमती वाढतील. या नव्या कर सुधारणेमध्ये सर्व खासगी सीएनजी/एलपीजी वाहनांसाठी वन टाईम करात १% वाढ करण्यात येणार आहे.

नवीन कर रचनेनुसार,वन टाईम कराची मर्यादा २० लाखांवरून ३० लाखांपर्यंत करण्यात आली आहे. परिणामी, २० लाखांपेक्षा जास्त एक्स-शोरूम किंमत असलेल्या वाहनांवर किमान ₹१० लाखांची कर वाढ होईल,(silver price) यामुळे वाहनांची ऑनरोड किंमत वाढलीय. यामुळे महाराष्ट्र सरकारला २०२५-२६ साठी सुमारे १७० कोटी रुपये अतिरिक्त महसूल मिळेल, असे आरटीओ अधिकाऱ्यांनी सांगितलंय.

केंद्र सरकाराचा मोठा निर्णय! ELI योजनेला मंजूरी, नोकरीच्या विश्वात पहिल्यांदाच येणाऱ्यांना मिळणार मोठी भेट

एखाद्याने आपल्या नावांनी नोंदणीकृत असलेल्या उच्च दर्जाच्या पेट्रोल आणि डिझेल वाहनांवर – ज्यांची किंमत अनुक्रमे सुमारे १.३३ कोटी आणि १.५४ कोटी आहे.(silver price) आता त्यांच्यावर एकरकमी २० लाख रुपयांचा कर आकारला जाईल. महाराष्ट्रात, व्यक्तीच्या नावाखाली नोंदणीकृत पेट्रोल कारसाठी १० लाख रुपयांपेक्षा कमी किमतीच्या कारसाठी ११%, १० लाख ते २० लाख रुपयांच्या कारसाठी १२% आणि २० लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या कारसाठी १३%असा वन-टाईम कर असणार आहे.

तर डिझेल कारसाठी १० लाख रुपयांपेक्षा कमी किमतीच्या कारसाठी १३%, १० लाख ते २० लाख रुपयांच्या कारसाठी १४% आणि २० लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या कारसाठी १५% कर आकारला जाईल. सीएनजी आणि एलएनजी वाहनांवर तिन्ही किंमत श्रेणींमध्ये वन-टाईम करात १% वाढ केली गेलीय. कंपनीच्या नावाखाली आयात केलेली किंवा नोंदणीकृत वाहने – पेट्रोल असो किंवा डिझेल वाहनांची किंमत काहीही असो, त्यावर २०% चा वन-टाइम कर आकारला जाईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितलंय.

पिकअप ट्रक, टेम्पो (७,५०० किलो पर्यंत एकूण वाहन वजन) आणि क्रेन, कॉम्प्रेसर आणि प्रोजेक्टर सारख्या बांधकाम वाहनांसह माल वाहतूक करणाऱ्या वाहनांवर त्यांच्या खरेदी किमतीच्या ७% दराने कर आकारला जाईल. दरम्यान ही कर प्रणाली मागील प्रणालीपेक्षा वेगळी आहे. आधी वाहनाच्या वजनावरून कर मोजला जात होता.

दरम्यान नवीन कर प्रणालीचं गणित आपण उदाहरणाने समजून घेऊ. समजा एखाद्याने महाराष्ट्रात १० लाख रुपयांची सीएनजी कार घेतली असेल तर त्याला आधी ७० हजार रुपये करापोटी द्यावे लागत. आता कर म्हणून ८०००० रुपए द्यावे लागणार आहेत. तसेच जर २० लाखांची सीएनजी कार घेतली तर १.४ लाख रुपयांऐवजी १.६ लाख रुपये कर द्यावा लागणार आहे. महाराष्ट्रात सीएनजी वाहनांना मोठी मागणी आहे. तसेच पेट्रोल, डिझेल कारसाठी किंमतीनुसार कर भरावा लागणार आहे.

हेही वाचा :

सोन्याच्या किंमतीत पुन्हा झाली घसरण!

सावधान! घरात मांजर पाळताय? संशोधनातून धक्कादायक माहिती उघड

चॉकलेटसाठी हट्ट केल्यावर जन्मदात्याने चार वर्षीय लेकीला संपवलं; पळून जात असतांना अटक…..