नित्या राणे अडकला, धार्मिक गरळ ओकणारा भडकावू विधान

धर्माच्या नावाने भडकावू आणि बेताल विधाने करणारे भाजप आमदार नितेश नारायण राणे चांगलेच आले आहेत. उच्च न्यायालयाच्या (court)दट्टय़ानंतर पोलिसांनी नितेश राणे व गीता जैन यांच्याविरुद्ध धार्मिक भावना दुखावल्याच्या आरोपावरून भारतीय दंड संहितेच्या कलम 295 (अ) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. मिंधे सरकारने प्रतिज्ञापत्राद्वारे उच्च न्यायालयाला तशी माहिती दिली आहे.

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर नितेश राणे, गीता जैन, टी. राजा या भाजप आमदारांनी अनेक ठिकाणी भडकावू विधाने केली. ही विधाने एकप्रकारे निवडणुकीत धार्मिक दंगल उसळवण्याचा कट असल्याचा दावा करीत शिक्षिका अफताब सिद्विकी यांच्यासह पाच जणांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या याचिकेवर न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि न्यायमूर्ती श्याम चांडक यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. पोलिसांनी याचिकेवर प्रतिज्ञापत्र दाखल केले. नितेश राणे यांच्याविरोधात चार पोलीस ठाण्यांत गुन्हा दाखल केला होता. त्यापैकी एका एफआयआरमध्ये धार्मिक भावना दुखावल्याच्या आरोपावरून नितेश राणे आणि गीता जैन यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केल्याचे प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. उर्वरित तीन पोलीस ठाण्यांच्या परिसरात केलेल्या भडकावू विधानांबाबतही  कलम 295 (अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी याचिकाकर्त्यांतर्फे ज्येष्ठ वकील गायत्री सिंह, अॅड. विजय हिरेमठ व अॅड. हमजा लकडावाला यांनी केली.

एफआयआर, भाषणाच्या ट्रान्सक्रिप्टची प्रत याचिकाकर्त्यांना द्या

नितेश राणे व गीता जैन यांच्याविरुद्ध दाखल केलेले एफआयआर तसेच भडकावू भाषणांच्या ट्रान्सक्रिप्टची फ़्रत तातडीने याचिकाकर्त्यांना द्या, असे आदेश खंडपीठाने मिंधे सरकारला दिले. त्यामुळे आरोपींची पाठराखण करण्याचा पोलिसांचा छुपा प्रयत्न समोर येऊन नितेश राणे व गीता जैन यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा :

NIA मध्ये सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; किती मिळेल पगार..

25 जूनपासून जोरदार बरसणार, राज्यात यावर्षी जास्त पावसाचा अंदाज आहे

आरोग्यमंत्र्यांसमोरच भाजप पदाधिकाऱ्याचा पारा चढला