आज पासून नवरात्रीला(political) सुरुवात झाली असून सर्वत्र देवीचा जागर होत आहे. याचपार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बुलढाण्यातील वेद विद्यालयाचे भुमिपूजन संपन्न झाले आहे. मुख्यमंत्री शिंदे माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले की, गोविंद गिरी महाराज यांच्या पुढाकाराने हे वेद विद्यालय होत आहे.
एक मोठी वास्तू या ठिकाणी उभी राहणार आहे, खऱ्या अर्थाने जगाला याची गरज आहे. सध्या महाराष्ट्रात विधानसभा निवडणूकांचा(political) रणसंग्राम पाहायला मिळत आहे. याबद्दल बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, कोणी कितीही खोडा घालण्याचा प्रयत्न केला तरी योजना चालूच राहतील.
या योजना लाडकी बहीण, लाडके भाऊ, लाडके शेतकरी यांच्या जीवनात अमूलाग्र बदल घडवण्यासाठी तयार केल्या आहेत. येणाऱ्या निवडणुकांमध्ये केलेला विकास, आणलेले उद्योग व कल्याणकारी योजना याची पोचपावती महायुतीला मिळणार आहे, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे.
हेही वाचा:
भाजप पक्षश्रेष्ठींकडून एकनाथ शिंदेंना झुकतं माप; भाजपमध्ये नाराजीचे सुर?
Google कडून मोठी घोषणा, आता Google Pay वर मिळणार गोल्ड लोनची सुविधा !
राज्याच्या राजकारणातील मोठी बातमी, भाजपचा ‘हा’ मोठा नेता ‘तुतारी’ हाती घेणार?