ना स्ट्रिप्सची गरज, ना पार्लरचा खर्च! ब्लॅकहेड्स काढण्यासाठी ‘या’ 4 टिप्सचा करा वापर

सुंदर दिसायला कोणाला आवडत नाही? यासाठी प्रत्येकजण अनेक प्रकारचे उपाय करतात.(beautiful)पण जर चेहऱ्याच्या सौंदर्यावर सर्वात जास्त परिणाम करणारी एक समस्या असेल तर ती म्हणजे ब्लॅकहेड्स. हे सहसा नाक, हनुवटी आणि कपाळावर दिसतात. खरं तर जेव्हा त्वचेचे छिद्र धूळ, तेल आणि मृत पेशींनी भरलेले असतात तेव्हा ते ऑक्सिजनच्या संपर्कात येताच काळे होतात. तेव्हाच ब्लॅकहेड्स तयार होतात. ही समस्या विशेषतः तेलकट त्वचा असलेल्या लोकांना अधिक जाणवते या समस्येला वारंवार तोंड द्यावे लागते.

बरेच लोकं ब्लॅकहेड्स काढण्यासाठी पिन किंवा स्ट्रिप्स वापरतात, परंतु यामुळे त्वचेचे नुकसान होऊ शकते. कधीकधी त्यामुळे त्वचेवर डाग देखील येऊ शकतात. यासाठी तुम्हाला हवे असेल तर तुम्ही काही घरगुती उपायांच्या मदतीने ब्लॅकहेड्स हळूहळू कमी करू शकता, तेही कोणत्याही दुष्परिणामांशिवाय. यामुळे त्वचा स्वच्छ आणि निरोगी होऊ शकते. (beautiful)आजच्या या लेखात आम्ही तुम्हाला काही सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय सांगणार आहोत, ज्यांचा अवलंब करून ब्लॅकहेड्स दूर करता येतात. चला सविस्तर जाणून घेऊयात…

वाफ घ्या
जर तुम्ही नियमितपणे स्टीम घेतली तर ब्लॅकहेड्सची समस्या दूर होईल. जर तुम्ही थेट स्टीम घेतली तर काही दिवसांत तुम्हाला त्याचा परिणाम दिसेल. तुम्ही आठवड्यातून दोनदा वाफ घेत रहा.(beautiful)पण जर तुम्हाला काही समस्या असेल तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेऊ हा उपाय करू शकता.

दालचिनी आणि लिंबू
तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर दालचिनी आणि लिंबाची पेस्ट लावा, यामुळे त्वचेचं रक्ताभिसरण सुधारेल . हे बनवण्यासाठी एक चमचा दालचिनी पावडर, चिमूटभर हळद आणि थोडा लिंबाचा रस एकत्र करा. आता ते चेहऱ्यावर 10 मिनिटे लावा. त्यानंतर साध्या पाण्याने चेहरा धुवा. यामुळे केवळ ब्लॅकहेड्सच नाहीसे होतील असे नाही तर तुमची त्वचा निरोगी दिसेल.

बेकिंग सोडा
बेकिंग सोडा हा एक नैसर्गिक एक्सफोलिएंट मानला जातो. तो आपल्या त्वचेवरील मृत त्वचेच्या पेशी काढून टाकण्यास मदत करतो. जर तुम्ही बेकिंग सोड्याची पेस्ट बनवून ब्लॅकहेड्सवर लावली तर ती तुमची त्वचा स्वच्छ करेल. लक्षात ठेवा की ही पेस्ट फक्त 10 ते 15 मिनिटे लावा.

ओटमील स्क्रब
ओटमील हे खाण्यासाठी फायदेशीर असण्यासोबतच त्वचेसाठीही खुप उपयुक्त आहे. त्यासोबत चेहऱ्यावर स्क्रब केल्याने ब्लॅकहेड्स देखील दूर होतात. ओटमील स्क्रब बनवण्यासाठी प्रथम ओटमील पाण्यात टाका. काही वेळाने ओट्स पाण्यात मऊ होताच त्याने त्वचेवर स्क्रब करा. यामुळे तुमची त्वचा चमकदार दिसेल. ब्लॅकहेड्स देखील कमी होतील.

ब्लॅकहेड्स का होतात?
प्रदूषणामुळे ब्लॅकहेड्सची समस्या सतावते.
त्वचा जास्त तेलकट होणे
मृत त्वचेच्या पेशींचा त्वचेवर तसेच राहणे.
त्वचेच्या छिद्रांचे वाढणे
हार्मोनल बदल

या गोष्टी लक्षात ठेवा.
कोणतीही उपाय फॉलो करण्यापूर्वी पॅच टेस्ट करा.
आठवड्यातून फक्त 2 ते 3 वेळा हे उपाय करा.
नियमितपणे चेहरा धुवा.
रात्री मेकअप काढूनच चेहरा स्वच्छ करा आणि झोपा.

हेही वाचा :

मित्रांच्या ग्रुपला धबधब्यावर पिकनिकला जाणं बेतलं जीवावर

महाराष्ट्रामधील Ola ची 385 शोरूम अचानक बंद… लाखो ग्राहकांना बसणार मोठा फटका

देशातील पहिली ई-वॉटर टॅक्सी मुंबईत धावणार, तारीख अन् ठिकाण झालं फिक्स, वाचा सविस्तर