इचलकरंजीमध्ये ढगफुटी सदृश्य मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळित – रस्त्यांवर पाणीच पाणी, नागरिकांमध्ये चिंता

इचलकरंजी शहरात आज दुपारी अचानक आलेल्या ढगफुटी सदृश्य मुसळधार पावसामुळे(rains) शहरातील जनजीवन पूर्णतः विस्कळित झाले आहे. विजेच्या कडकडाटासह कोसळणाऱ्या या पावसामुळे संपूर्ण शहराची वाहतूक आणि दैनंदिन व्यवहार ठप्प झाले. काही मिनिटांतच शहराच्या विविध भागांमध्ये जलप्रलयासारखी परिस्थिती निर्माण झाली.



पावसाची (rains)तीव्रता इतकी होती की, अनेक भागांमध्ये अर्धा ते एक फूट पाणी साचले. बाजारपेठा, मुख्य रस्ते आणि वसाहतींच्या भागांमध्ये पाणी साचल्याने वाहनचालक आणि पादचाऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. काही दुकाने आणि घरे पाण्याखाली गेल्याने व्यापारी व नागरिकांचे आर्थिक नुकसान झाले.


या मुसळधार पावसामुळे काही काळ वीजपुरवठा खंडित झाला होता. विजेच्या कडकडाटामुळे काही भागांतील झाडे उन्मळून पडल्याने विद्युत वाहिन्यांना अडथळा निर्माण झाला. मात्र, महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने उपाययोजना करत वीजपुरवठा लवकरच पूर्ववत केला.

हवामान विभागाने पुढील काही तास जोरदार पावसाचा इशारा दिल्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी, असा सल्ला देण्यात आला आहे.

हेही वाचा :