पुणे : महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाने इयत्ता दहावी व बारावी परीक्षा दहा ते बारा दिवस आधीच घेण्याचे निश्चित केले आहे. मात्र, परीक्षेच्या वेळेत सोशल मीडियावर(social media) वेळापत्रक व्हायरल होणे व सूचनांच्या भडीमारामुळे विद्यार्थी-पालकांमध्ये गोंधळ निर्माण होतो. तर अनेक खासगी शिकवणी सेंटरच्या वेळापत्रकामुळे विद्यार्थ्यांची परीक्षाही हुकल्याचे प्रकार घडलेले आहेत.
विद्यार्थ्यांना फटका बसण्याच्या या गोष्टींना आळा घालण्यासाठी मंडळाने मोबाईल ॲप तयार केले असून, ज्याद्वारे या दोन्ही परीक्षा तसेच त्यांच्या निकालाची माहिती विद्यार्थी-पालकांना ॲपवर पाहता येईल.
राज्य माध्यमिक व उच्च व्यमिक शिक्षण मंडळाने या ॲपची निर्मिती केली आहे. मागील काही वर्षात परीक्षांसदर्भात सोशल मीडियावर(social media) पसरवलेल्या अनावश्यक माहितीमुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम तयार होत आहे. अशा पार्श्वभूमीवर विद्यार्थी, पालक, शिक्षकांनी हवी असलेली नेमकी व अचूक माहिती उपलब्ध होणार आहे.
पालक-विद्यार्थ्यांसाठी हे ॲप विनामूल्य असल्याचे राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी सांगितले. दरवर्षी छत्रपती संभाजीनगरमधून दहावी-बारावीच्या परीक्षेसाठी पावणेदोन लाख विद्यार्थी बसतात.
परीक्षेत कॉपी करणाऱ्या विद्याथ्यवर कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात येणार आहे, परीक्षांची गुणवत्ता राखण्यासाठी आणि पेपरफुटीसारख्या घटनांना आळा घालण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. अनेकदा संभ्रम निर्माण करणारी माहिती समाज माध्यमात येते. परीक्षेची तयारी केलेले विद्यार्थी गोंधळू नये म्हणून ही सुविधा देण्यात आल्याचे मंडळाचे विभागीय अध्यक्ष अनिल साबळे यांनी सांगितले.
हेही वाचा :
शरद पवार गटातील ‘हा’ बडा आमदार अजितदादांच्या भेटीला, चर्चेला उधाण
काँग्रेस-भाजप कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा; काँग्रेसचं कार्यालय फोडलं, Video व्हायरल
बसमध्ये छेड काढणाऱ्या व्यक्तीला महिलेने, 25 वेळा कानशिलात हाणलं अन् Video Viral