कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : 70 हजार कोटी रुपयांच्या सिंचन घोटाळ्याचा झालेला आरोप हा अजितदादा पवार यांच्यासाठी मोठा आघात होता. त्यांच्या राजकीय (politics)आयुष्यात झालेली ही सर्वात मोठी जखम होती. ही जखम अधून मधून, तिच्यावरची खपली काढल्यामुळे ओली होते. आणि मग ती ठसठसत राहते. आता या जखमेवरची खपली त्यांनीच काढली आहे. आणि पुन्हा सिंचन घोटाळ्याची चर्चा विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत सुरू झाली आहे.
सुमारे 70 हजार कोटी रुपयांचा सिंचन घोटाळा हा भारतीय जनता पक्षाने बाहेर काढला होता. तेव्हा देवेंद्र फडणवीस हे प्रमुख विरोधी पक्ष नेते होते. त्यांनी हे प्रकरण चांगलेच लावून धरले होते. तेव्हा आर. आर. पाटील हे राज्याचे गृहमंत्री होते. त्यांनी गृहमंत्री या नात्याने सिंचन घोटाळा प्रकरणाची लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने चौकशी करण्याच्या आदेशावर स्वाक्षरी केली होती. आणि तेव्हा आर आर पाटील यांनी स्वाक्षरी केलेली फाईल विरोधी पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस यांना दाखवली होती असा खळबळजनक दावा अजित दादा पवार यांनी नुकताच केला असून, त्यांच्याकडून झालेला हा विश्वासघात होता असेही त्यांनी म्हटले आहे.
सध्या आर आर पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील हे तासगाव विधानसभा(politics) मतदारसंघातून प्रथमच निवडणूक लढवत आहेत. नेमक्या त्याच वेळी अजितदादा यांच्याकडून करण्यात आलेल्या आरोपामुळे पाटील कुटुंबीय व्यथित झालेले आहे. याबद्दलचा योग्य तो खुलासा करण्यासाठी आर आर पाटील हे हयात नाहीत. ते या जगात नसताना त्यांच्यावर करण्यात आलेला आरोप हा अतिशय दुर्दैवी असल्याचे त्यांच्या कुटुंबीयांकडून म्हटले गेले आहे.
अजित दादा पवार आणि आर आर पाटील(politics) हे दोघेही राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांच्यानंतरचे मोठे नेते. या दोघांमध्ये चांगले मैत्र होते. आर आर आबा यांना तंबाखू खाण्याची भयंकर सवय होती. तंबाखू ही आरोग्यासाठी अतिशय घातक आहे. त्यामुळे असले घाणेरडे व्यसन तुम्ही करू नका असे हक्काने सांगणारे अजित दादा पवार हे एकमेव होते. या दोघांमध्ये घट्ट मैत्री असताना आता काही गोष्टी बाहेर येऊ लागल्या आहेत. आबांनी ती फाईल फडणवीस यांना दाखवायला नको होती असे विधान अजितदादा यांनी नुकतेच केले आहे.
अजित दादा पवार यांच्यावर 70हजार कोटी रुपयांच्या सिंचन घोटाळ्याचा आरोप झाला होता तेव्हा आम्ही अविभाजित राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एकत्र होतो. तेव्हा आम्ही दादांच्या पाठीमागे ठामपणे उभा होतो. आता हा खरोखरच सिंचन घोटाळा झाला होता किंवा नाही हे देवेंद्र फडणवीस यांनी आता पुढे येऊन सांगितलं पाहिजे असे खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.
ज्यांनी सिंचन घोटाळ्याचा आरोप केला त्या देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत अजितदादा पवार हे सत्तेत आहेत. त्यामुळे या प्रकरणाबद्दल त्यांनी सांगितलेच पाहिजे. महाराष्ट्राला या घोटाळ्यातील नेमकी वस्तुस्थिती माहित झाली पाहिजे. आर आर पाटील यांच्यावर आरोप केले ते अजित दादा पवार यांनी आणि तेही आबांच्या जन्मभूमीत म्हणजे तासगाव मध्ये. खुलासा करण्यासाठी संबंधित व्यक्ती जिवंत नाही. म्हणून मग त्याबद्दल अजित दादा पवार यांनीच पाटील कुटुंबीयांची माफी मागितली पाहिजे पण माफी मागितली आहे ती सुप्रिया सुळे यांनी.
सिंचन घोटाळ्याचे प्रकरण आता जुने झाले आहे. अँटी करप्शन ब्युरो ने अजितदादा(politics) यांना क्लीन चीट ही दिली आहे.आता लोकांनी या सिंचन घोटाळ्यात पुढे काही होणार नाही हे वास्तव स्वीकारलेले आहे. पण तरीही विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने अजित दादा पवार यांनीच त्यांना झालेल्या जखमेवरची खपली काढली आहे.”उघड्या पुन्हा जहाल्या, जखमा उरातल्या”असेच या प्रकरणात म्हणावे लागेल.
आपल्या विरुद्ध युगेंद्र पवार हा आपला सख्खा पुतण्या निवडणुकीत प्रतिस्पर्धी म्हणून पुढे येईल असे अजित दादा पवार यांना स्वप्नातही वाटले नसेल. आता त्याबद्दल त्यांना अतिशय वेदना होत असतील. शरद पवार यांनी आता आपले घर फोडले अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. घर फोडल्याची जखम त्यांना झाल्याची दिसते. पण अशा वेदनादायी आणि मनात खोलवर जखमा करण्याची सुरुवात कोणी केली?
हेही वाचा :
आज नरक चतुर्दशीला लक्ष्मी योग! जाणून घ्या पूजेचा शुभ मुहूर्त
रिकाम्या पोटी असे खा मनुका, रक्ताची कमतरता होईल दूर
“बेबी..आपली लव्हस्टोरी रामायणापेक्षा कमी नाही”; सुकेशचं जॅकलिनला आणखी एक पत्र