आता विदर्भात काका विरुद्ध पुतण्या निवडणुकीत नात्यांचा उत्सव

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : चांगल्या गोष्टी नसून टाकतं त्याला राजकारण(politics) म्हणतात. मैत्री, नाती, संवाद, कुटुंब यामध्ये माती घालवण्याचे काम राजकारण करतात. शत्रूचा शत्रू तो आपला मित्र हे म्हटलं जात असलं तरी ती मैत्री सुद्धा आता घटकाभरची बनली आहे. सोनू विरुद्ध सासरा, बाप विरुद्ध मुलगा, बहिण विरुद्ध भाऊ, ननंद विरुद्ध भावजय, भावा विरुद्ध भाऊ आणि काका विरुद्ध पुतण्या अशा लढती यापूर्वी लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात झाल्या आहेत.

लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकीत आपलाच मुलगा, आपलाच पुतण्या, आपलाच नातू, आपलाच भाऊ, आपलीच बहीण यापैकी कुणाला तरी उमेदवारी मिळाली पाहिजे. अशा प्रयत्नात नेते मंडळी नेहमीच दिसत असतात. तर असा हा नात्यांचा राजकीय उत्सव? गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात उत्साहाने सुरू आहे. प्रत्येकाला वाटते की आता ज्येष्ठांनी आपल्याला संधी दिली पाहिजे, त्यातून हा अनेक कुटुंबाचा राजकलह सुरू आहे. आता विदर्भात काटोल मतदारसंघात आणखी एक पुतण्या काका विरुद्ध निवडणूक आखाड्यात उतरणार आहे.

पश्चिम महाराष्ट्रातील शरद पवार विरुद्ध अजितदादा पवार हा राजकीय(politics) वाद साऱ्या महाराष्ट्राला माहीत असून आता तर तो अधिक संघर्षमय वळणावर येऊन पोहोचला आहे. एकमेकांना राजकारणातून संपूर्ण टाकण्याचे डावपेच त्यांच्यात सुरू आहेत. काका मला वाचवा असे ओरडत काका कडे जाणारा पुतण्या पुण्यातील तत्कालीन जनतेने पेशवाईच्या काळात पहिला आहे. आता वर्तमान आता त्याच पुण्यात काका आणि पुतण्या स्वतःच राजकारण वाचवण्यासाठी एकमेकांच्या विरुद्ध टाकले आहेत. इतिहासात असे अनेक नाते संघर्ष झालेले पाहायला मिळतात.

महाविकास आघाडीच्या सरकारमधील गृहमंत्री अनिल देशमुख यांचा काटोल हा विदर्भातील विधानसभा मतदारसंघ आहे. याच मतदारसंघातून ते विधान सभेवर निवडून जातात. यंदा मात्र त्यांचे पुतणे सलील देशमुख हे या मतदारसंघातून काकाला आव्हान देण्याच्या तयारीत आहेत. निवडणुकीची पूर्वतयारी म्हणून आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात सलील देशमुख यांनी अनिल देशमुख यांच्या कथित भ्रष्टाचारावर कठोर भाष्य केले आहे. त्यांच्यावर शंभर कोटी रुपये भ्रष्टाचाराचा आरोप झाला, त्यांची ईडी चौकशी झाली, त्यातून ते तुरुंगात गेले, हे मुद्दाम त्यांनी या कार्यक्रमात सांगितले आहे.

आता या भ्रष्टाचारी माणसाला पुन्हा निवडून देणार काय असा अप्रत्यक्षपणे सवाल करून त्यांनी आपली उमेदवारी जवळपास घोषित केली आहे. विधानसभेच्या सर्वाधिक जागा म्हणजे 288 पैकी 62 जागा विदर्भात आहेत. त्यातच काटोल हा विधानसभा मतदारसंघ आहे. आणि आता तेथे पुतण्याविरुद्ध काका असा राजकीय संघर्ष सुरू झालेला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठे बंड करून अजितदादा पवार यांनी वेगळी चूल मांडल्यानंतर त्यांचा शरद पवारांच्या विरुद्ध संघर्ष अधिक टोकदार झाला आहे.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत सुनेत्रा पवार (politics)विरुद्ध सुप्रिया सुळे असा ननंद भावजय संघर्ष उभ्या महाराष्ट्राने पाहिला आहे. तर गेल्या अनेक वर्षांपासून बीड जिल्ह्यात पंकजा मुंडे विरुद्ध धनंजय मुंडे हा राजकीय संघर्ष बहीण भावामध्ये सुरू आहे. मात्र राजकारणाचे संदर्भ बदलले आणि हे दोन बहिणी भाऊ राजकारणात एकत्र आलेले आहेत. काहीजण ज्या पक्षात आहेत त्या पक्षातून त्यांना उमेदवारी देण्यात अडचण येत असल्याचे पाहून दुसऱ्या पक्षात जाताना दिसतात.

नवी मुंबई येथे विद्यमान आमदार माजी मंत्री गणेश नाईक यांना ऐरोली मतदारसंघातून आणि त्यांचा मुलगा संदीप नाईक याला बेलापूर मतदारसंघातून महायुतीकडून उमेदवारी हवी आहे. नाही मिळाली तर ते दुसरा विचार करण्याच्या तयारीत आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात नारायण राणे हे भाजपचे विद्यमान खासदार आहेत आणि आता त्यांचे जेष्ठ चिरंजीव निलेश राणे यांना विधानसभेची उमेदवारी भाजपाकडून मिळावी म्हणून प्रयत्नात आहेत. शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटातून रोहित पवार हे विद्यमान आमदार आहेत आणि ते शरद पवार यांचे नातू आहेत. आता आणखी एक युगेंद्र पवार विधानसभेच्या निवडणुकीत उतरत आहेत. तेही शरद पवार यांचे नातू आहेत.

निवडणूक आणि सत्ताकारणात कायमच नात्यांचा उत्सव होत असलेला दिसतो. प्रस्थापित नेते मंडळी अगदी अपवादात्मक स्थितीत घराबाहेरचा म्हणजे जवळच्या वर्तुळातील कार्यकर्त्याचा विचार करताना दिसतात. एकूणच राजकारणात एकीकडे कौटुंबिक कलह दिसतो तर दुसरीकडे घराणे शाही दिसते.

हेही वाचा:

मशाल घेऊन चटके द्या; अजित पवारांना मोठा धक्का!

JioCinema आणि Disney Hotstar यूजर्ससाठी महत्त्वाची बातमी

‘सॉरी मम्मी, पप्पा…’ लेकीच्या भविष्याची स्वप्न पाहणाऱ्या आईवडिलांना दिसला तिचा मृतदेह आणि…