कोल्हापुरात थरकाप उडवणाऱ्या अपघाताचा व्हिडिओ व्हायरल

कोल्हापूर : राज्यात हिट अँड रनची मालिका सुरुच असतानाच आता कोल्हापुरातील(new video) अंगावर शहारे आणणारा अपघाताचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. कोल्हापुरातील उचगाव रोडवरील घाडगे पाटील इंडस्ट्रीज कंपनीबाहेर कामावर जात असताना तरुणाला भरधाव कारने मागून धडक दिली.

हा अपघात इतका भयंकर होता की धडक बसल्यानंतर(new video) तरुण हवेत उडाला. त्यामुळे तो गंभीर जखमी झाला आहे. ही संपूर्ण घटना जवळच्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. व्हिडीओच्या आधारे पोलिसांनी अज्ञात कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना 28 ऑगस्ट रोजी मध्यरात्री 12.20 च्या सुमारास घडली. दरम्यान, कोल्हापुरातील उचगाव रोडवरील घाडगे पाटील इंडस्ट्रीज कंपनीबाहेर भीषण अपघात झाला. 24 वर्षीय रोहित सखाराम हप्पे रात्रपाळीसाठी पायी जात होता. कार्यालयापासून काही अंतरावर असताना एका भरधाव कारने त्यांना धडक दिली. या घटनेचा व्हिडिओही व्हायरल होत आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडिओनुसार एका पांढऱ्या रंगाच्या कारने त्यांना धडक दिली. टक्कर इतकी जोरदार होती की रोहित हवेत उडाला. रोहितच्या डोक्याला आणि दोन्ही पायाला दुखापत झाली आहे. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी गांधीनगर पोलीस ठाण्यात निवेदनही आले आहे. सध्या अज्ञात कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे त्याची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

हेही वाचा:

राहुल द्रविडच्या मुलाची टीम इंडियात एंट्री…

सप्टेंबर महिन्याचा पहिला आठवडा ‘या’ जन्मतारखेच्या लोकांसाठी ठरणार लकी

इचलकरंजी शहरातील मंदिरांमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ