सध्या रीलचे वेड लोकांना अशाप्रकारे जडले आहे की यासाठी लोक वाटेल त्या थराला जायला बघतात. आपल्याला व्हायरल होता यावे यासाठी लोक नको ते करायला बघतात. या गोष्टीची प्रचिती आपल्याला नेहमीच (social media)सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या अशा व्हिडिओजमधून मिळत असते.
तुम्ही (social media)सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असाल तर तुम्हीही असे व्हिडिओज कधी ना कधी नक्कीच पाहिले असावेत. आता देखील सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, यात माणुसकीला काळिमा फासणारे विकृत कृत्य दिसून आले. व्हिडिओतील दृश्ये तुम्हाला थक्क तर करतीलच मात्र तुमचा रागाचा पाराही वाढवतील.
ही घटना पंजाबमधील जालंधरमध्ये घडून आली. व्हिडिओत तरुणाने व्हायरल होण्यासाठी जिवंत घोरपडीला धक्कादायक बाब म्हणजे यावेळीश्वानांच्या पुढ्यात टाकल्याचे दिसून आले. धक्कादायक बाब म्हणजे यावेळी घोरपडीचे पाय हे दोरीने बांधून ठेवले होते, ज्यामुळे आपला जीव वाचवण्यासाठी तिला कोणताही प्रयत्न करता आला नाही.
श्वानांनी फार निर्घृणपणे घोरपडीची हत्या केली आणि ही सर्व घटना तरुणाने आपल्या फोनच्या कॅमेरात कैद करत सोशल मीडियावर शेअर केली. माणूस आपल्या स्वार्थ्यासाठी किती खालच्या पातळीला जाऊ शकतो याचे उत्तम उदारहण या व्हिडिओतून सर्वांना दिसून आले.
दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, मनदीप असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. इंस्टाग्रामवरील व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका घोरपडीला बांधून श्वानाच्या समोर टाकले आहे. यावेळी पिसाळलेला श्वान घोरपडीवर हल्ला चढवतात आणि अक्षरशः आपल्या तोंडात पकडून, खेचत तिची शिकार करतात.
यावेळी घोरपडीचे हात-पाय बांधून ठेवलेलेही यात दिसून येतात, ज्यामुळे तिला कोणतीही हालचाल करता येत नाही. या सर्व विकृत घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच पंजाब पोलिसांनी तरुणास अटक केली आहे.
हा व्हायरल व्हिडिओ @mandee5103 नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओवर अनेकांनी कमेंट्स करत या घटनेवर आपल्या संतापजनक प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “अरे तुला अक्कल आहे का? तुझ्या मेंदुवर काहीतरी परिणाम झाला आहे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे , “कृपया याला अटक करा”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.
हेही वाचा :
आज मकर संक्रांतीच्या दिवशी ‘या’ 3 राशींची चांदीच चांदी! भरघोस आर्थिक लाभ
वाढते वजन कमी करा: सकाळच्या नाश्त्यासाठी नाचणी स्मूदीचा सेवन, वजन होईल कमी
महिला लाभार्थींनो, लाडकी बहीण योजनेसंदर्भातील ‘ही’ बातमी तुम्हाला माहिती आहे का?