बुढ़ापे में भी तुम्हारा काल बनकर चट्टान की भांति खड़ा हूं,… अटक वॉरंटनंतर लालूप्रसाद यादवांचा जुना Video व्हायरल

बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव(video) यांच्याविरोधात ग्वाल्हेरच्या खासदार आमदार न्यायालयाने अटक वॉरंट जारी केलं आहे. त्यामुळे आता बिहारचं राजकारण तापलं आहे. यावर सर्वच स्तरातून राजकीय प्रतिक्रिया येत आहेत. आता खुद्द लालू प्रसाद यादव यांची प्रतिक्रिया सोशल मीडियावरून समोर आली आहे. यात त्यांचा एक एक व्हिडिओही व्हायरल होत आहे.

माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांच्यावर 1995 आणि 1997 मध्ये बनावट फॉर्म(video) क्रमांक 16 तयार करून कथितरीत्या शस्त्रास्त्रांचा पुरवठा केल्याप्रकरणी आरोप करण्यात आला होता. याप्रकरणी लालू यादव यांच्याविरोधात कायमस्वरूपी अटक वॉरंट जारी करण्यात आलंय. त्यामुळे त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. आता या प्रकरणी त्यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.

लालू प्रसाद यादव यांची ही प्रतिक्रिया मायक्रो ब्लॉगिंग साइट X वर आली आहे. त्यांनी जुन्या मुलाखतीचा एक व्हिडिओ शेअर करत त्यांच्या पोस्टमध्ये लिहिलं आहे की, ”मूली थोड़े हैं कि उखाड़ के फेंक दोगे. लालू प्रासाद यादव नाम है. इस बुढ़ापे में भी तुम्हारा काल बनकर चट्टान की भांति खड़ा हूं, अपने उसूलों पर अड़ा हूं.”

ग्वाल्हेरच्या खासदार-आमदार न्यायालयाने लालू प्रसाद यादव यांच्याविरोधात एक वर्ष जुन्या प्रकरणात कायमस्वरूपी अटक वॉरंट जारी केलं आहे . शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत हे वॉरंट जारी करण्यात आलं आहे. या प्रकरणात माजी केंद्रीय मंत्री लालू यादव यांना फरार घोषित करण्यात आलं होतं. त्यावेळी त्यांनी बनावट कागदपत्रांचा वापर करून शस्त्र विक्रेत्याकडून शस्त्रे खरेदी केल्याचं पोलीस तपासात उघड झालं आहे.

कागदपत्रात नमूद केलेले लालू यादव हे बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय मंत्री असल्याची न्यायालयाला खात्री पटली. त्यानंतर लालू यादव यांच्याविरुद्धचा हा खटला खासदार-आमदार न्यायालयात वर्ग करण्यात आला होता. ग्वाल्हेरचे खासदार-आमदार न्यायालयाचे एडीपीओ अभिषेक मेहरोत्रा ​​यांनी सांगितलं की, विशेष न्यायदंडाधिकारी खासदार-आमदार ग्वाल्हेर महेंद्र सिंह यांच्या कोर्टातून आरोपी लालू प्रसाद यादव यांच्यासाठी कायमस्वरूपी अटक वॉरंट जारी करण्यात आलं आहे.

हेही वाचा :

इंडिया आघाडीचा पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? राहुल गांधींनी दिलं उत्तर

‘रावेर’चा गड खालसा करण्यासाठी शरद पवारांची मोठी खेळी, भाजपच्या ‘या’ नेत्याला उमेदवारी?

टेस्लाने सुरू केली ‘राइट-हँड ड्राईव्ह’ गाड्यांची निर्मिती; लवकरच भारतात करणार लाँच