“पुन्हा एकदा गणपती खड्डयांतून आणावे लागणार, विकासाच्या नावाखाली राणेंनी….”

कणकवली : तालुक्यात राणे विरुद्ध उपरकर अशी खडाजंगी सुरु आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासाबाबत बोलताना माजी आमदार परशुराम उपरकर यांनी राणे कुटुंबाला टोला लगावला आहे. जिल्ह्याच्या विकासासाठी पालकमंत्री आढावा बैठक घेत जनतेची दिशाभूल करीत आहेत. त्याप्रमाणे खासदार नारायण राणे(political) यांनी देखील महामार्ग व विविध विभागाच्या आढावा बैठका घेतल्या , परंतु यातुन जनतेचे प्रश्न मार्गी लागलेत का ? असा सवाल उपरकरांनी केला आहे.

उपरकर पुढे असंही म्हणाले की, नवीन सार्वजनिक बांधकामच्या अधिक्षक कार्यालय झाले . त्याठिकाणी अधिक्षक अभियंता पदावर नियुक्तीची ऑर्डर होऊनही संबंधित अधिकारी हजर झालेले नाहीत. पाटबंधारे विभागात रिक्त पदे आहेत. जिल्ह्यातील विविध प्रशासकीय पदावर अधिकारी नसल्याने विकास कामांवर परिणाम होत आहे, असा आरोप उपरकर यांनी केला आहे. तसंच प्रमोद जठार यांच्या मागणीनुसार छत्रपतींचे स्मारक सिंधुदुर्ग किल्यावर उभारावे , अशी मागणी देखील उपरकरांनी केली.

कणकवली येथील आपल्या संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत उपरकर म्हणाले की,नारायण राणे व पालकमंत्री आपण बैठक घेत विकास करत आहोत, असे भासवत आहेत. जिल्ह्यातील महामार्गासह ग्रामीण रस्ते पूर्णत: खड्डेमय झालेले आहेत. त्यामुळे चालु वर्षी पुन्हा एकदा गणपती खड्डयांतून आणावे लागणार , अशी मानसिकता लोकांनी करायला हवी.

शिवसृष्टी करताहेत त्याठिकाणी 30 लाख गुंठे दराने जमीन खरेदीचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला आहे. ही शासनाची लूट आहे. यापूर्वी चिपी विमानतळासाठी(political) 150 परगुंठा दराने जमीन घेतली तर सीवर्ल्ड प्रकल्पासाठी शासनाने परगुंठा 1 हजार दर जाहिर केला होता , अशी आठवण परशुराम उपरकर यांनी करुन दिली आहे.

भाजपाचे माजी आमदार प्रमोद जठार यांनी आमदार असताना अरबी समुद्रातील स्मारक हे ख-या अर्थाने मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या किल्ल्यात उभारण्यात यावे. कोट्यावधी रुपये तिकडे खर्च करण्यापेक्षा मालवण समुद्रात हे स्मारक व्हावे अशी जठार यांची मागणी होती. त्यावर भाजपाचे नेते बोलत नाहीत. त्याउलट शिवसृष्टीच्या नावाखाली शासनाची लूट चालवली आहे. राजकोट येथील पुतळ्यासाठी कोट्यावधी रुपये खर्च करुन नागरिकांसाठी पुतळा पाहण्यास बंद ठेवण्यात आला आहे , असा टोला उपरकर यांनी लगावला.

पॉलिटेक्निक आणि आयटीआयमध्ये कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत वाढवण बंदरात आवश्यक असलेल्या नोकर भरतीच्यानुसार प्रशिक्षण देण्याबाबत पालकमंत्री नितेश राणे यांनी बैठक घेतली. मात्र आयटीआय व पॉलिटिक्निकमधील प्रश्न असलेली रिक्त पदे सोडविण्याबाबत कोणतेही प्रश्न नाहीत. फक्त दिखाऊपणाचा विकास सुरु असल्याचा टोला उपरकर यांनी लगावला आहे.

हेही वाचा :

मोठी बातमी! आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल;

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी; ‘महाराष्ट्राच्या विधानसभेत…’

‘त्या’ गोष्टीमुळे पारुपल्लीने आणि मी घटस्फोट…, अखेर सायनाने सगळं सांगून टाकलं!