एक क्लिक आणि घरातील टीव्ही होईल कम्प्युटर, अंबानींचा मास्टरस्ट्रोक

रिलायन्स जिओने JioPC लाँच केले आहे. तर हा PC काही साधारण नाही.(computer)जिओचा हा AI-रेडी क्लाऊड कंप्यूटर ‘JioPC’ तुमच्या टीव्ही स्क्रीनला स्मार्ट पीसीमध्ये बदलतो. त्यासाठी एका विशेष हार्डवेअरची गरज नाही. तुमचा मासिक प्लॅन अवघ्या 400 रुपयांपासून सुरु होतो.हे तंत्रज्ञान एक क्लाउड-बेस्ड व्हर्चुअल डेस्कटॉप आहे. ते अगदी काही सेकंदात तुमच्या टीव्हीला एका हायटेक कम्युटरमध्ये बदलून टाकेल. जर तुमच्याकडे जिओ फायबक, जिओ एअर फायबर असेल तर फायद्यात असाल. नवीन युझर्ससाठी ही सेवा एक महिन्यापर्यंत मोफत असेल.

JioPC भारताचे असे पहिले कम्युटर आहे, ज्यात ‘पे-एज-यू-गो’ मॉडल आहे. म्हणजे जितका तुमचा वापर, तितकाच खर्च हा त्यासाठीचा मंत्र आहे.यामध्ये कोणताही लॉक-इन पीरियड नाही. तुम्हाला वाटेल तेव्हा ही सेवा बंद करता येते. त्यासाठी सॉफ्टवेअर, हार्डवेअरच्या अपग्रेडची गरज नाही.(computer) प्लग इन करा. साईन अप करा आणि कम्युटरचा अनुभव घ्या.

JioPC एकदम जबरदस्त असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. त्यात दैनंदिन कामासह गेमिंग आणि ग्राफिक्सचा वापर करता येईल. कंपनीचा दावा आहे की, बाजारात असा कम्युटर 50 हजारांपेक्षा कमी किंमतीत मिळणार नाही.JioPC चा प्लॅन केवळ 400 रुपये प्रति महिना सुरू होईल.(computer) तुम्ही कमी खर्चात हायटेक संगणकाचा वापर करु शकाल. ग्राहकाला 512 GB क्लाउड स्टोरेज आणि अनेक AI टूल्स आणि Apps मोफत मिळतील.

हेही वाचा :

रक्षाबंधनाआधीच बहिणीचा अक्राळविक्राळ चेहरा, भावाचा गळा दाबून…

महाराष्ट्र मंत्रिमंडळात ‘वाईल्ड कार्ड’ एन्ट्रीची शक्यता! शिंदेंकडून ‘मास्टरस्ट्रोक’, अजित पवार गटाला धक्का?

जैन समाजाचे एकत्रित आवाहन – JIO चा बहिष्कार करून माधुरीसाठी न्याय मागा