करमाळा तालुक्यातील शेटफळ गावाचा सुपुत्र आणि महाराष्ट्र पोलीस दलात पी.एस.आय. पदावर कार्यरत असलेले अमित लबडे यांनी पुन्हा एकदा आपल्या कर्तृत्वाची छाप सोडली आहे. मुंबई शहरात घडलेल्या एका महत्त्वाच्या आणि गुंतागुंतीच्या गुन्ह्याचा यशस्वी तपास करत त्यांनी तो गुन्हा पिंपरी चिंचवड परिसरात उकलण्यात मोलाची भूमिका बजावली.

या गुन्ह्याच्या तपासात त्यांनी दाखवलेली दक्षता, चिकाटी, आणि उत्कृष्ट पोलिसी कौशल्य यामुळे आरोपींना अटक करण्यात आणि गुन्ह्याचा मागोवा घेण्यात महत्त्वाचे यश मिळाले. या यशस्वी तपासाबद्दल पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त मा. विनयकुमार चौबे साहेब यांच्या हस्ते पी.एस.आय. अमित लबडे यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
गावकऱ्यांसाठी ही अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे की, शेटफळ गावातील सुपुत्राने संपूर्ण राज्यपातळीवर आपली कार्यक्षमता दाखवून एक आदर्श निर्माण केला आहे. त्यांच्या या कर्तबगारीबद्दल शेटफळ ग्रामस्थ, नातेवाईक, मित्रपरिवार, आणि सहकाऱ्यांकडून त्यांचे अभिनंदन होत आहे.
अमित लबडे यांचे यश हे नवोदित पोलीस अधिकाऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे आणि त्यांच्या या योगदानामुळे महाराष्ट्र पोलीस दलाचा सन्मान वाढला आहे.