एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांचा हा फोटो आहे रामासमोर. (hands)ओवेसींनी हात जोडतानाचा हा फोटो प्रचंड व्हायरल होतोय हा फोटो व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर कमेंटचा पाऊस पडलाय.काहींनी तर ओवेसींना शिवीगाळही केलीय.पण, खरंच ओवेसी आता राम भक्त झालेयत का…? ओवेसींचा हा फोटो कुणी काढलाय…? हा फोटो कधीचा आहे…? याची आम्ही पडताळणी सुरू केली.त्याआधी मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहुयात.

भगवान श्री रामाच्या मूर्तीसमोर एमआयएमचे खासदार ओवेसींनी हात जोडून नमस्कार केलाय.हा मेसेज आणि फोटो व्हायरल होत असल्याने आम्ही याची पडताळणी सुरू केली.याबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी ओवेसींचं सोशल मीडिया अकाऊंट तपासून पाहिलं.तिथे आम्हाला कुठेही असा फोटो सापडला नाही. (hands)त्यामुळे आमच्या टीमने हा फोटो तपासून पाहिला त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहुयात.

रामाच्या मूर्तीसमोर हात जोडल्याचा फोटो खोटा आहे. एआयच्या माध्यमातून ओवेसींचा फोटो बनवण्यात आला आहे. ओवेसींनी खरचं रामाला नमस्कार केलेला नाही. एआय निर्मित फोटो व्हायरल करून दिशाभूल करण्यात येत आहे.एआयमुळे कोणाच्याही फोटोशी छेडछाड करणं शक्य आहे,अशा प्रकारचे व्हिडिओही बनवता येतात आणि त्यातून लोकांची दिशाभूल केली जातेय,त्यामुळे अशा फोटोवर विश्वास ठेवू नका. (hands)आमच्या पडताळणीत श्री रामाच्या मूर्तीसमोर ओवेसींनी हात जोडल्याचा दावा असत्य ठरलाय.
हेही वाचा :
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! मोदी सरकार 4% महागाई भत्ता वाढवणार
भारतीय महिला संघ तिसऱ्या T20 सामन्यात कोसळला! इंग्लडने 5 धावांनी मिळवला विजय