दक्षिण कोलकात्यातील विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थिनीवर सामूहिक(college)बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हे प्रकरण समोर आल्यानंतर संपूर्ण देशातून संताप व्यक्त केला जातोय.मिळालेल्या माहितीनुसार लॉ कॉलेजच्या या 24 वर्षीय पीडित विद्यार्थिनीवर एकूण तिघांनी सामूहिक अत्याचार केला आहे. या प्रकरणात आता अनेक धक्कादायक खुलासे होत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार पीडित महिलेला अत्याचारादरम्यान पॅनिक अटॅक आला होता. मात्र इनहेलर देऊन पुन्हा या पीडितेवर अत्याचार करण्यात आला आहे.

ही अमानवी घटना घडल्यानंतर पीडितेने पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनीही प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन तपास चालू केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार पीडित विद्यार्थिनीवर 25 जूनच्या रात्री 7.30 ते 10.30 वाजेर्यंत हे कुकृत्य करण्यात आलंय. पीडित विद्यार्थिनीने तिच्यासोबत नेमकं काय घडलं? याती आपबीती सांगितली आहे. तक्रारीनुसार आपल्यासोबत काहीतरी अघटीत घडणार याची कल्पना पीडितेला आली होती. (college)त्यानंतर तिला पॅनिक अटॅक आला.
मात्र या सामूहिक बलात्कार प्रकरणातील प्रमुख आरोपी मनोजित मिश्रा याने आपल्या साथीरादारंना इनहेलर आणायला सांगितले. त्यानंतर हे इनहेलर पीडित विद्यार्थिनीला देण्यात आले. इनहेलरमुळे विद्यार्थिनीला बरे वाटले. तिला श्वास घेता येई लागला. संधी मिळताच तिने त्या नराधमांच्या तावडीतून सुटण्यासाठी पळ काढला. मात्र महाविद्यालयाचे मुख्य प्रवेशद्वार बंद होते. त्यामुळे पीडित विद्यार्थिनी काहीच करू शकली नाही.
याच गोष्टीचा फायदा घेत तिन्ही आरोपींनी पीडित विद्यार्थिनीला जबरदस्तीने सुरक्षा रक्षकांच्या रुममध्ये नेलं. तिथे आरोपींनी विद्यार्थिनीवर सामूहिक अत्याचार केले. विशेष म्हणजे मुख्य आरोपी मनोजित मिश्रा हा विद्यार्थिनीवर अत्याचार करत असताना अन्य दोन आरोपी फोनमध्ये रेकॉर्डिंग रत होते.(college)दरम्यान, काही दिवसांपूर्वी पश्चिम बंगालमध्ये आरजी कर वैद्यकीय महाविद्यालयात महिला डॉक्टरवर बलात्काराचा असाच धक्कादायक प्रकार घडला होता. त्यानंतर आता कोलकात्यातील लॉ कॉलेजमध्येच एका विद्यार्थिनीवर सामूहिक अत्याचार करण्यात आला आहे. त्यामुळे आता या प्रकरणी दोषींवर कठोरातील कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे.
हेही वाचा :
उबाठा सेनेत बेरजेचे नव्हे तर वजाबाकीचे राजकारण
सावधान! घरात मांजर पाळताय? संशोधनातून धक्कादायक माहिती उघड
चॉकलेटसाठी हट्ट केल्यावर जन्मदात्याने चार वर्षीय लेकीला संपवलं; पळून जात असतांना अटक…..