गुगलचे भारतासाठी मोठे पाऊल! भारतात स्वच्छ ऊर्जा क्षमता वाढविण्यासाठी क्लीनमॅक्सबरोबर केली भागीदारी

जागतिक पातळीवरील अव्वल तंत्रज्ञान कंपनी असलेल्या गुगलने(Google) आज क्लीन मॅक्स एन्व्हायरो एनर्जी सोल्युशन्स (क्लीनमॅक्स) कंपनीबरोबर भागीदारीची घोषणा केली आहे. क्लीनमॅक्स ही आशियातील अग्रगण्य अक्षय ऊर्जा आणि व्यावसायिक आणि औद्योगिक क्षेत्रासाठी नेट-झिरो पर्याय प्रदान करणारी दिग्गज कंपनी आहे. त्यामुळे या भागीदारीचा लाभ देशासाठी होणार आहे.

उभय कंपन्यातील भागीदारी अंतर्गत क्लीनमॅक्स 125.4 मेगावॅट क्षमतेचा हायब्रीड ऊर्जा प्रकल्प उभारणार आहे. यात राजस्थानमध्ये 66 मेगावॅट क्षमतेचा सौरऊर्जा प्रकल्प तर कर्नाटकात 59.4 मेगावॅट क्षमतेचा जलविद्युत प्रकल्पाचा समावेश आहे, हा प्रकल्प राष्ट्रीय ग्रीडशी जोडला जाणार असून गुगलची(Google) क्लाऊड सेवा तसेच भारतभरातील गुगलच्या कार्यालयांसाठी डिकार्बोनायझेशन (कार्बन उत्सर्जन मुक्त) उद्दीष्टे साध्य करण्यासाठी सहाय्य करणार आहे. यातून प्रत्येक ग्रीडशी जोडले गेलेली गुगलची सर्व कार्यालये आणि आस्थापनांचे कामकाज आठवडयातील सर्व दिवस 2030 पर्यंत कार्बन मुक्त ऊर्जेवर चालविण्याच्या उद्दीष्टाशी हा प्रकल्प संरेखित राहणार आहे.

भारतातील डिकार्बोनायझेशन पुढाकारासाठी गुगलबरोबर भागीदारी करताना आम्हाला अतिशय आनंद होत असल्याची टिप्पणी करत क्लीनमॅक्सचे व्यवस्थापकीय संचालक कुलदिप जैन म्हणाले, “शाश्वतता आणि नेट-झिरो उद्दीष्टासाठी जागतिक पातळीवर विविध कपन्यांबरोबर भागीदारी करण्यावर क्लीनमॅक्सने सदैव आपले लक्ष केंद्रीत केलेले आहे. गुगल सोबतचे हे सहकार्य केवळ पर्यावरणीय नेतृत्वासाठी एक नवीन मापदंडच ठरवत नाही तर हवामान बदलाविरुद्धच्या लढ्यात वास्तविक बदल घडवून आणण्यासाठी आमची सामायिक वचनबद्धता देखील प्रकट करते.”

गुगलच्या आशिया पॅसिफिक क्षेत्रासाठी क्लीन एनर्जी अ‍ॅण्ड पॉवर विभागाचे प्रमुख ज्योर्जिओ फॉर्च्युनाटो या भागीदारीबद्दल भाष्य करताना म्हणाले, “हा महत्त्वाचा उपक्रम गुगलच्या भारतातील शाश्वत वाढीस समर्थन देतो. तसेच आम्ही जिथे काम करतो, त्या प्रत्येक ग्रिडमध्ये आमच्या कार्यालयीन कामकाजासाठी स्वच्छ ऊर्जा स्त्रोतासाठी गुगलची वचनबद्धता अधोरेखित केली जाते. शाश्वततेच्या तत्वांनुसार आमचा व्यवसाय कार्यरत ठेवताना अस्सल प्रभाव निर्माण करणे आणि त्याचबरोबर लवचिक अशा अल्प -कार्बन उत्सर्जन प्रणालींकडे संक्रमण करण्यासाठी अर्थयुक्त धोरणात्मक सहकार्याच्या सामर्थ्यावर आमचा विश्वास आहे.”

सदर प्रकल्प 2025 च्या चौथ्या तिमाहीत आपले व्यावसायिक कामकाज सुरु करण्याची अपेक्षा आहे. हा प्रकल्प दरवर्षी अंदाजे 350,000 दशलक्ष किलोवॅट अवर (kWh) कार्बन मुक्त ऊर्जा निर्माण करणार आहे. त्यामुळे दरवर्षी कार्बन डायऑक्साईड़चे उत्सर्जन अंदाजे 250,000 टनांनी कमी होईल. दरवर्षी 14.7 दशलक्ष झाडे लावण्याइतके हे कार्य आहे. यातून हवामानातील बदल कमी करण्यावर प्रकल्पाचा महत्त्वपूर्ण प्रभावही अधोरेखित होतो.

हेही वाचा:

आज ‘या’ राशींवर राहणार देवी ब्रह्मचारिणीची कृपा!

इचलकरंजीत डॉल्बीचा अतिरेक: पोलीस निष्क्रिय, नागरिक त्रस्त

हर्षवर्धन पाटील यांच्यानंतर आता ‘हा’ नेता फुंकणार ‘तुतारी’?; शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेशाची शक्यता